Chnadrayan -3 : चंद्रावर ऑक्सिजन आहे ,मात्र हायड्रोजनचा शोध सुरु

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील निरीक्षणाचा मार्ग मोकळा करून महत्त्वपूर्ण डेटा गोळा करण्यास सुरुवात केली आहे

154
Chnadrayan -3 : चंद्रावर ऑक्सिजन आहे मात्र हायड्रोजनचा शोध सुरु
Chnadrayan -3 : चंद्रावर ऑक्सिजन आहे मात्र हायड्रोजनचा शोध सुरु

भारताच्या चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा शोध लागला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे चंद्रयान-3 (Chnadrayan -3) ला आढळले आहेत. तसंच चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोखंड, क्रोमियम, टायटॅनियमही असल्याचेही आढळलं आहे. या सर्व मुलद्रव्यांचे पुरावे सापडल्यानं चांद्रयान मोहिमेतला हा मोठा शोध मानला जातोय. चांद्रयानाकडून मात्र अजूनही शोध केला जात आहे.

‘इस्रो’ने चंद्रयान-3चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून इतिहास रचला. १४ जुलै रोजी चंद्रयान-3 चं प्रक्षेपण झालं होतं. ४० दिवसांचा प्रवास करून चंद्रयान-3चे ‘विक्रम’ लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. यानंतर ‘विक्रम’ लँडरमधून ‘प्रज्ञान’ रोव्हरने बाहेर येत संशोधनाला सुरूवात केली आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेतील चंद्रयान-3 नं चंद्राच्या गूढ गोष्टींमध्ये खोलवर जाण्यास सुरुवात केली आहे. चंद्रयान-3 नं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील निरीक्षणाचा मार्ग मोकळा करून महत्त्वपूर्ण डेटा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. चांद्रयानचं ऐतिहासिक टचडाउन होऊन पाच दिवस झाले असून, आता त्याचे सर्व आठ वैज्ञानिक पेलोड अ‍ॅक्टिव्ह आहेत.
लँडर विक्रमवरील पेलोड्सपैकी एक असलेल्या चंद्राच्या सरफेस थर्मो फिजिकल एक्सपेरिमेंटमधून (ChaSTE) असे पहिले निष्कर्ष समोर आले आहेत. हा प्रयोग विशेषत: स्पेस फिजिक्स लॅबोरेटरी (SPL), विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) आणि अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (PRL) यांच्या सहकार्याने ध्रुवीय प्रदेशाजवळील चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीचे थर्मल गुणधर्म मोजण्यासाठी विकसित केला गेला आहे.
चंद्राचा पृष्ठभाग खूपच असमान आहे आणि वेगवेगळ्या जाडीच्या ‘रेगोलिथ’ नावाच्या ढिगाऱ्याच्या थरानं झाकलेला आहे. सध्याचा समज असा आहे की, चंद्राचा पृष्ठभाग काहीसा ‘फ्लफी’ आहे आणि कदाचित तो उष्णतेचा चांगला वाहक नसावा. अंतराळ संशोधकांचं म्हणणं आहे, की नजीकच्या भविष्यात चंद्रावर विस्तारित मानवी उपस्थितीचं नियोजन करण्यासाठी चंद्रावरील मातीचं भिन्न स्वरूप समजून घेणं महत्त्वाचं आहे.

(हेही वाचा : Apple iPhone 15 : १२ सप्टेंबरला ‘आयफोन १५’ लाँच होण्याची शक्यता )
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर ऑक्सिजनसह काही मुलद्रव्ये आढळून आली आहेत. ‘प्रज्ञान’ रोव्हवरील लेझर-प्रेरित ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोपी ( एलआयबीएस ) उपकरणाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर इन-सीटू मोजमाप केलं. तेव्हा हा शोध लागला आहे.प्रज्ञान’ रोव्हरला संशोधनावेळी चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर ( एस ) असल्याचं आढळून आलं. तर, हायड्रोजनचा ( एच ) शोध घेतला जात असल्याचं ‘इस्रो’नं सांगितलं आहे.‘इस्रो’नं ट्वीट करत सांगितलं की, “रोव्हरवरील लेझर-प्रेरित ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोपने प्रथमच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर सल्फर ( एस ) आढळून आलं. अल्युमिनियम ( एआय ), सल्फर ( एस ), कॅल्शियम ( सीए ), लोखंड ( एफई ), क्रोमियम ( सीआर ), टायटॅनियम ( टीआय ), मँगनीज ( एमएन ), सिलिकॉन आणि ऑक्सिजन ( ओ ) आढळलं आहे.

हेही पहा : 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.