मध्य रेल्वेकडून दोन हजाराहून अधिक पदासाठी भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. या पदासाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करु शकतात.
रेल्वेत नोकरी करण्याची उत्तम अशी नामी संधी चालून आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून भरतीसंदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेत अपरेंटिस यापदासाठी हजारो उमेदवारांची पदे रिक्त आहेत. उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोकरीसाठी अर्ज करु शकतात. उमेदवार आजपासूनच अर्ज करु शकतात तर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर आहे.
भारतीय रेल्वेकडून मध्य रेल्वेत नोकरीची ही संधी चालून आली आहे. रेल्वे अपरेंटिससाठी २४०९ पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यातील मुंबई क्लस्टरमध्ये १६४९ पदे, पुणे क्लस्टरमध्ये १५२ पदे, सोलापूर क्लस्टरमध्ये ७६ पदे, भुसावळ क्लस्टरमध्ये ४१८ पदे आणि नागपूर क्लस्टरसाठी ११४ पदांसाठी जागा रिक्त आहेत.
हेही वाचा – ‘Ganeshotsav 2023 : श्री गणेश मूर्ती आगमन – विसर्जन मार्गावरील अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणीला वेग
शिक्षण व वयाचे बंधन –
रेल्वेत नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी एखाद्या मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा त्याच्या समकक्ष किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्रही असायला हवे. रेल्वेच्या अधिसूचनेनुसार, या भरती अंतर्गंत अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १५ ते २४ वर्षांपर्यंत असावे.
निवड प्रक्रिया कशी करणार?
या पदांसाठी उमेदवाराच्या निवडीसाठी गुणवत्ता यादी दहावीतील गुणांची टक्केवारी (किमान ५०% एकूण गुणांसह) + ITI ज्या ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप करायची आहे त्या आधारे तयार केली जाईल.
हेही पहा – Chnadrayan -3 : चंद्रावर ऑक्सिजन आहे ,मात्र हायड्रोजनचा शोध सुरु
उमेदवारांना किती असेल स्टायपेंड
भारतीय रेल्वेत उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना दर `महिन्याला ७ हजार रुपयांचा स्टायपेंड देण्यात येईल.
यासाठी द्यावे लागणारे शुल्क –
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. उमेदवार डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग/एसबीआय चलन इत्यादीद्वारे अर्ज फी भरू शकतात. अधिक तपशीलांसाठी उमेदवार संकेतस्थळाची मदत घेऊ शकतात.