Ganeshotsav : कोल्हापुरात गणेश आगमन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी ‘लकी ड्रॉ ‘

मिरवणुकीला शिस्त लावण्यासाठी राजारामपुरी पोलिसांनी हा लकी ड्रॉ यावर्षी आठवड्यापूर्वीच काढण्याचा निर्णय घेतला आहे.

141
Ganeshotsav : कोल्हापुरात गणेश आगमन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी लकी ड्रॉ
Ganeshotsav : कोल्हापुरात गणेश आगमन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी लकी ड्रॉ

राजारामपुरीतील गणेश आमगन मिरवणुकीत मंडळ कितव्या क्रमांकावर असणार आहे, हे ठरविण्यासाठीचा लकी ड्रॉ      ११ सप्टेंबरला निघणार आहे. गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) जल्लोष काय असेल, याची प्रचिती याच मिरवणुकीतून येते. सार्वजनिक गणेश मंडळाना आपल्या गणपती हा मनाच्या पहिल्या १० क्रमांकावर असावी अशी भावना प्रत्येक सार्वजनिक मंडळांची असते. मात्र आता मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी लकी ड्रा ही संकल्पनेचा अवलंब करण्यात येणार आहे.
मिरवणुकीला शिस्त लावण्यासाठी राजारामपुरी पोलिसांनी हा लकी ड्रॉ यावर्षी आठवड्यापूर्वीच काढण्याचा निर्णय घेतला आहे. राजारामपुरी जनता बझार ते मारुती मंदिर या मुख्य मार्गावर गणेश आमगन मिरवणूक निघते. या मिरवणुकीत कोणत्या क्रमांकावर कोणते मंडळ थांबणार यावरून वाद होतो. यातून सार्वजनिक शांततेचा भंग होतो. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे पूर्वीच मंडळांना त्यांचा क्रमांक मिळावा, या उद्देशाने हा लकी ड्रॉ असणार आहे.

(हेही वाचा : Chnadrayan -3 : चंद्रावर ऑक्सिजन आहे ,मात्र हायड्रोजनचा शोध सुरु)

यापूर्वी गणेश आमगनाच्या एक किंवा दोनदिवस पूर्वीच हा ड्रॉ निघत होता. मात्र, या ड्रॉ मुळे अधिक सुसुत्रता यावी, ज्या मंडळांना क्रमांक मिळणार नाही, त्यांना मिरवणुकीत प्रवेश दिला जाणार नाही. आपले मंडळ मिरवणुकीत असणार की नाही याची माहिती आठवड्यापूर्वीच मिळावी याउद्देशाने हा ड्रॉ लवकर काढण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.