Maharashtra Politics : महाराष्ट्रात राजकारणाचा पारा तापला…

बंगळुरूमधील यशस्वी बैठकांनंतर इंडियाची ही तिसरी बैठक आहे

172
Maharashtra Politics : महाराष्ट्रात राजकारणाचा पारा तापला...
Maharashtra Politics : महाराष्ट्रात राजकारणाचा पारा तापला...
मुंबई प्रतिनिधी
एकीकडे इंडिया आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी सांताक्रुझच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये होत आहे. पाटणा आणि बंगळुरूमधील यशस्वी बैठकांनंतर इंडियाची ही तिसरी बैठक आहे. या बैठकीला देशातील २६ पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे एक वेगळे महत्त्व आहे. इंडियाच्या लोगोचे अनावरण करण्याबरोबरच आघाडीचा भविष्यातील संयुक्त कार्यक्रम ठरवला जाणार आहे. येत्या काळात आघाडीच्या संयुक्त प्रचारसभा देशभरात घेतल्या जाणार आहेत. त्या कशा पद्धतीने आणि कुठे घ्यायच्या याचे धोरण या बैठकीत आखले जाणार आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीला शह देण्यासाठी महायुतीने देखील कंबर कसली असून उद्या आणि परवा महायुतीची बैठक होणार असून यामध्ये राज्यातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीमध्ये कुठल्याही पद्धतीनं जागा वाटपाबाबत चर्चा होणार नाही, केवळ आढावा बैठक आहे. या बैठकीला महायुतीच्या घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, इतर मंत्री तसेच अन्य महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहतील. अशा मुळेच कुठेतरी महाराष्ट्रातील राजकारणाचा पारा तापल्याचे चित्र दिसून येत आहे.
विरोधकांच्या ‘इंडिया’आघाडीच्या मुंबईत होणार्‍या बैठकीला शह देण्यासाठी भाजपनेही महायुतीची बैठक त्याच दोन दिवशी मुंबईत आयोजित केली आहे. वरळीला ही बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारसंघांच्या आढाव्यासाठी ही बैठक होणार आहे.पण महायुतीला या बैठकीचा मुहूर्त इंडियाच्या बैठकीदिवशीच मिळाला, हे विशेष. यामुळे गुरुवारी ३१ ऑगस्ट आणि शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी मुंबईत इंडिया विरुद्ध महायुती असा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे.

(हेही वाचा –Municipal license : शासनाच्या पारपत्र विभाग आणि आयकर विभागाच्या धर्तीवर)

३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर असे दोन दिवस सांताक्रूझ येथील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलात विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक होणार आहे. याच दिवशी राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि आरपीआय आठवले गट यांची संयुक्त बैठक मुंबईमध्ये होणार आहे. वरळीला नॅशनल स्पोर्ट्स क्लब डोम येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीची माहिती देण्यासाठी महायुतीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदे घेऊन माहिती दिली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह आरपीआय (आठवले गट), आरपीआय (जोगेंद्र कवाडे गट), बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, जन सुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर, प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ८ वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सर्व प्रमुख नेते व मंत्री यांच्यासह भोजन कार्यक्रम व चर्चा असा कार्यक्रम ठरलेला आहे. त्याचप्रमाणे १ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून तिन्ही पक्षांचे सर्व आमदार, खासदार, सर्व संपर्क प्रमुख, नेते आणि जिल्हाध्यक्ष तसेच विधानसभा प्रमुख यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप विरोधकांच्या ‘इंडिया’आघाडीची राष्ट्रीय पातळीवरील तिसरी बैठक होणार आहे. त्याच गुरुवार व शुक्रवारी अशा दोन्ही दिवशी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या महायुतीची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत महायुतीच्या वतीने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे.
इंडिया आघाडी ची मुंबईतील बैठक गुरुवार आणि शुक्रवारी’ग्रँड हयात’हॉटेलमध्ये होत आहे. तर महायुतीची बैठक वरळीच्या डोम सभागृहात होणार आहे. यामुळेच मुंबईत इंडिया विरुद्ध महायुती असे बैठकांचे सत्र रंगणार आहे. तर ‘इंडिया’च्या बैठकीला शह देण्याकरिताच भाजपने ही रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसेच इंडियाच्या बैठकीला एकतर्फी प्रसिद्धी मिळू नये आणि बैठकीवरून लक्ष विचलित करण्याकरिता महायुतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
 
आज संयुक्त पत्रकार परिषद
इंडिया बैठकीबाबत माहिती देण्यासाठी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद उद्या सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि नाना पटोले या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. बैठकीचा दोन दिवसांचा कार्यक्रम कशा पद्धतीने असेल याबाबत ते माहिती देणार आहेत.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=_PR8G4X8h3A

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.