राज्यभरातील पथकांकडून विमा संरक्षणाविषयी करण्यात आलेली मागणी मान्य झाली आहे. दहीहंडी उत्सव आणि प्रो गोविंदा लीगसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मनोरे रचणाऱ्या राज्यातील 50 हजार गोविंदांना विमा संरक्षण मिळणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील गोविंदांना 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे गोविंदा पथकांकडून स्वागत करण्यात आले असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री यांच्याप्रती आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
(हेही वाचा – कुर्ल्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुंडाकडून एकावर गोळीबार)
मुंबई, ठाणे आणि राज्यातील अनेक भागांत दहीहंडी उत्सव तसेच प्रो-गोविंदा लीग स्पर्धा भव्य प्रमाणात आयोजित करण्यात येते. या उत्सव आणि स्पर्धेत हजारो गोविंदा आणि गोपिका सहभागी होतात. दहीहंडी हा साहसी खेळ असल्याने तो खेळताना गोविंदांना अपघात होतात. अशावेळी गोविंदा पथकांना रुग्णालयात दाखल करून त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज पडते. काही वेळा गोविंदांचा अपघातामुळे मृत्यूही होतो. यासाठी गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती.
हेही पहा –