नारायण राणे आणि शिवसेना हा वाद काही नवा नाही. 2015 च्या पोट निवडणुकी राणेंनी चक्क शिवसेनेला मातोश्रीच्या अंगणात आव्हान दिले होते. मात्र त्यावेळी जरी नारायण राणे अपयशी ठरले असले तरी देखील आता नितेश राणे यांनी शिवसेनेचा टप्यात कार्यक्रम केला आहे. ज्या तृप्ती सावंत यांच्याकडून राणेंना पराभव पत्करावा लागला होता त्याच तृप्ती सावंत यांना भाजपमध्ये आणण्यात त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे आता राणेंनी मातोश्रीच्या अंगणातच शिवसेनेला धक्का दिला आहे. शिवसेनेच्या विधानसभेच्या बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वांद्रे पूर्व या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मतदारसंघात, तृप्ती सावंत यांनी शिवसेनेचे प्रतिनिधीत्व केले होते. मात्र त्यांनीच आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
( हेही वाचा : पुन्हा गाठली १० हजार रुग्ण संख्या, ३१ जणांचा मृत्यू!)
म्हणून तृप्ती सावंत शिवसेनेवर नाराज
तृप्ती सावंत यांना 2019 च्या निवडणुकीत डावलून शिवसेनेने माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मतदारसंघातील शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला होता. इथे काँग्रेसचा उमेदवार झिशान सिद्दीकी यांनी बाजी मारली. तेव्हा पासून तृप्ती सावंत या शिवसेनेपासून दूर होत्या मात्र आता त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
राणेंमुळे वांद्रे पोट निवडणुकीची चर्चा
बाळा सावंत यांच्या निधनानंतर वांद्रे पूर्वची पोट निवडणूक लागली. मात्र ही निवडणूक चर्चेत आली ती नारायण राणे यांनी थेट मातोश्रीच्या अंगणात दंड थोपटल्याने. मात्र नारायण राणे यांना पोटनिवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता.
Join Our WhatsApp Community