BJP Strategy : पराभूत जागा जिंकण्यासाठी भाजपने बदलली रणनिती

भारतीय जनता पक्षाचे पंडित दीनदयाल मार्गावरील मुख्यालय निवडणुकीच्या 'वार रूम'मध्ये रूपांतरीत

130
BJP Strategy : पराभूत जागा जिंकण्यासाठी भाजपने बदलली रणनिती
BJP Strategy : पराभूत जागा जिंकण्यासाठी भाजपने बदलली रणनिती

वंदना बर्वे

भारतीय जनता पक्षाचे पंडित दीनदयाल मार्गावरील मुख्यालय निवडणुकीच्या ‘वार रूम’मध्ये रूपांतरीत झाले असल्याचे दृष्य बघायला मिळत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यालयात बैठकांची अखंडित श्रृंखला सुरू झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या मुख्यालयात बैठकांचा हंगाम सुरू झाला आहे. नड्डा यांनी काल मंगळवारी सर्व महासचिवांची बैठक बोलावून लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. ही बैठक सुमारे दीड तास चालली.

खास करून कालची बैठक ही 2019 मध्ये भाजपचा पराभव झालेल्या 161 जागांवरच्या रणनितीबाबत होती. 2024 मध्ये या जागांवर विजय कसा मिळवायचा? याची रणनिती ठरविण्यासाठी महासचिव विनोद तावडे यांच्यासह पाच नेत्यांची समिती नेमण्यात आली होती. यात राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, माजी सरचिटणीस नरेश बन्सल, पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा आणि राष्ट्रीय सचिव हरीश द्विवेदी यांचा समावेश आहे. कालच्या बैठकीत या 161 जागांवर चर्चा झाली.

(हेही वाचा – Dahi handi : राज्यातील गोविंदांसाठी आनंदाची बातमी ! 10 लाख रुपयांपर्यंत मिळणार विमा संरक्षण)

भाजपातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या 161 जागा जिंकण्यासाठी भाजपने खास रणनिती तयार केली आहे. या जागांतर्गत विधानसभेचे जवळपास 1000 मतदारसंघ येतात. विधानसभेच्या या मतदारसंघात दिग्गज नेत्यांना उतरवायचे आणि अशा पध्दतीने 161 लोकसभा मतदारसंघात विजय मिळवायचा, अशी रणनिती भाजपने ठरविली आहे.

या 161 जागांवर विजय मिळविण्यासाठी आखलेली रणनिती व्यापक आहे. दिग्गज नेत्यांना विधानसभानिहाय उतरवून जागा जिंकणे हा प्लान नंबर एक आहे. याशिवाय, प्लान बी असा की, समितीने केंद्र सरकारच्या काही कल्याणकारी योजनांचा अभ्यास केला आहे. त्यात असे आढळून आले की, जवळपास 27 ते 28 अशा योजना आहेत ज्यांची अंमलबजावणी या 161 मतदारसंघात प्रभावीपणे केली तर भाजपच्या झोळीत यश पडल्याशिवाय राहणार नाही. सोबतच बूथचे वर्गीकरण, रोड मॅप, राजकीय सामाजिक विश्लेषण आणि सोशल मीडिया गटांची निर्मिती या गोष्टींना खास महत्व दिले जात आहे. आता  याचा आढावा घेण्यासाठी १५ दिवसांनी पुन्हा एक बैठक बोलाविण्यात आली आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.