Aditya L – 1 : आता स्वारी सूर्यावर ! इस्रोचे आदित्य एल-१ अवकाशात झेपावण्यासाठी तयार

सौरमोहिमेद्वारे सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर, अंतराळातील हवामान, सौरवादळे आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम या सर्व गोष्टींचा अभ्यास करणार

213
Aditya L - 1 : आता स्वारी सूर्यावर ! इस्रोचे आदित्य एल-१ अवकाशात झेपावण्यासाठी तयार
Aditya L - 1 : आता स्वारी सूर्यावर ! इस्रोचे आदित्य एल-१ अवकाशात झेपावण्यासाठी तयार

चंद्रयान ३ नंतर आदित्य एल-१ द्वारे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) सूर्याचा अभ्यास करणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो आदित्य एल – १ (Aditya L – 1) हे यान सूर्याच्या दिशेने पाठवणार आहे. या सौरमोहिमेद्वारे सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर, अंतराळातील हवामान, सौरवादळे आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे. दरम्यान, या सौरमोहिमेची तयारी पूर्ण झाली असल्याचे इस्रोने सांगितले आहे. या लाँचिंगचा सराव (तालीम) पूर्ण झाला आहे. रॉकेटची चाचणी पूर्ण झाली असून इस्रोचं यान सूर्याच्या दिशेने झेपावण्यासाठी सज्ज आहे, असे इस्रोने बुधवारी जाहीर केले.

(हेही वाचा – Dahi handi : राज्यातील गोविंदांसाठी आनंदाची बातमी ! 10 लाख रुपयांपर्यंत मिळणार विमा संरक्षण)

या सौरमोहिमेसाठी इस्रोच्या यू.आर. राव उपग्रह केंद्रात तयार केलेला उपग्रह २ आठवड्यांपूर्वी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील इस्रोच्या स्पेसपोर्टवर पोहोचवण्यात आला आहे. येथूनच आदित्य एल-१ हे यान अवकाशात झेपावणार आहे. २ सप्टेंबर रोजी पीएसएलव्ही या प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह सूर्याच्या दिशेने पाठवला जाईल. सकाळी ११.५० वाजता हे अवकाशयान लाँच केले जाईल. (Aditya L – 1)

नागरिकांना याचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी https://lvg.shar.gov.in/VSCREGISTRATION/index.jsp या लिंकवर नोंदणी करावी लागेल. SDSC-SHAR, श्रीहरिकोटा येथील लॉन्च व्ह्यू गॅलरीतून हे प्रक्षेपण सर्वजण पाहू शकतात. ISRO ने यासंबंधी एक द्वीट करत नागरिकांना प्रक्षेपण पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे. (Aditya L – 1)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.