Malaria Patient Increase : मुंबईत मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ

२० ते २७ ऑगस्ट या कालावधीतील हिवतापाचे ९५९, डेंग्यू ७४२, गॅस्ट्रो ८१९ चे रुग्ण आढळून आले आहेत.

143
Malaria Patient Increase : मुंबईत मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ
Malaria Patient Increase : मुंबईत मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ

मुंबईसाठीच्या आजारांचा विळखा वाढत असून मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांच्या रुग्ण संख्येत आठवड्याभरात २०० ते २५० ने वाढ झाली. पावसाने मुंबईत पाठ फिरवली असली पावसाळी आजारांचा पहिला कायम आहे. २० ते २७ ऑगस्ट या कालावधीतील हिवतापाचे ९५९, डेंग्यू ७४२, गॅस्ट्रो ८१९ चे रुग्ण आढळून आले आहेत. वीस दिवसांत हिवताप रुग्णांची आकडेवारी बरीच वाढली आहे

संपूर्ण ऑगस्ट महिन्यात शनिवारी २६ ऑगस्ट रोजी मुंबईत मुसळधार पाऊस झाला. आता पुन्हा मुंबईत साचलेल्या पाण्याच्या नजीकच्या रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाऊन पोटाची बाधा झालेले रुग्ण वाढत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. अँटीबायोटिक्सचा पूर्ण कोर्स करूनही काही रुग्णांना पटकन आराम मिळत नसल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली. सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. सांधेदुखी डेंग्यूचे लक्षण असू शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. मलेरियाच्या तुलनेत डेंग्यू जास्त घातक आजार मानला जातो, त्यामुळे डेंग्यूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

(हेही वाचा – Kurla : कुर्ल्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुंडाकडून एकावर गोळीबार)

काय काळजी घ्याल –
  • रस्त्यावरचे उघडे अन्नपदार्थ खाऊ नका.
  • साचलेल्या पाण्याजवळच्या नागरी वसाहतीतील माणसांनी आरोग्याची आवश्यक काळजी घ्या.
  • रस्त्यावर साचलेल्या पाण्यात शक्यतो जाऊ नका. पावसात घराबाहेर पडण्यापूर्वी पायाला जखम असल्यास बाहेर जाणे टाळा किंवा मलमपट्टी लावून बाहेर पडा.
  • घराबाहेर छप्परावर साचलेले पाणी स्वच्छ करा.
  • घरातील भांडी तसेच झाडाच्या कुंडयात साचलेले पाणी सतत बदलत रहा.
  • पाणी उकळून प्या.
  • तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस पोटदुखी असल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क साधा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.