चीनने नुकताच देशाचा नकाशा जाहीर केला होता. या नकाशाद्वारे चीन अक्साई चीनमध्ये (Aksai China) पीपल्स लिबरेशन आर्मीकडून मोठ्या प्रमाणात कारवाया करत असल्याचे उघड झाले आहे. येथे मोठ्या प्रमाणात भूमीगत बांधकामे करण्यात येत आहेत. युद्धकाळात शस्त्रसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि हवाई हल्ल्यांपासून सुरक्षा मिळवण्यासाठी ही तयारी करण्यात आल्याचे सॅटेलाईटने काढलेल्या छायाचित्रांमधून दिसत आहे.
(हेही वाचा – Aditya L – 1 : आता स्वारी सूर्यावर ! इस्रोचे आदित्य एल-१ अवकाशात झेपावण्यासाठी तयार)
डिसेंबर २०२१ च्या छायाचित्रांच्या तुलनेत ऑगस्ट २०२३ च्या छायाचित्रांमध्ये फरक सहज दिसून येतो. छायाचित्रांमधून अक्साई चीनच्या (Aksai China) १५ चौ किमीच्या प्रदेशात सहा ठिकाणी बंकर आणि अंडरग्राऊंड सुविधा उभारण्यात आल्याचं दिसत आहे. हा भाग प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून ७० किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी चीनकडून सैन्य तैनात करण्यात आले आहेत.
ऑगस्टमधील छायाचित्रांमधून या भागात ये-जा करता येणारी उपकरणे, रस्ते बांधल्याचे दिसत आहे. तज्ञांच्या मते भूमीगत बांधकामे शस्त्रे सुरक्षित ठेवण्यासाठी बांधण्यात आली आहेत. हवाई हल्ल्यापासून वाचण्यासाठीही ही बांधणी चीनच्या लष्कराला उपयोगाची ठरणार आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
चीनने सोमवारी जारी केलेल्या नकाशामध्ये, १९६२ मध्ये गिळंकृत केलेला अक्साई चीन (Aksai China), अरुणाचल प्रदेश दाखवला आहे. अरुणाचल प्रदेश तिबेटचा दक्षिण भाग असल्याचा चीनदा दावा आहे. या विपर्यस्त नकाशात भारताचा भाग असलेला अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचे दाखवले होते. चीनच्या मंत्रालयाकडून सोमवारी हा नकाशा जाहीर करण्यात आला होता. यावर भारत सरकारकडून आक्षेप घेण्यात आला आहे. तैवानला नकाशामध्ये स्थान देण्यात आला आहे. चीनचा अनेक भागावरुन इतर देशांशी वाद आहे. नव्या नकाशामुळे हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची जी-२० संमेलनादरम्यान भेट झाली होती. यादरम्यान त्यांच्यात चर्चाही झाली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community