Raksha Bandhan Special: रक्षाबंधन ओवाळणीसाठी बहिणीने लढवली अनोखी शक्कल, हातावर काढला क्यू आर कोड

आधुनिक युगाला साजेसे रक्षाबंधन

139
Raksha Bandhan Special: रक्षाबंधन ओवाळणीसाठी बहिणीने लढवली अनोखी शक्कल, हातावर काढला क्यू आर कोड
Raksha Bandhan Special: रक्षाबंधन ओवाळणीसाठी बहिणीने लढवली अनोखी शक्कल, हातावर काढला क्यू आर कोड

भावा-बहिणीचे प्रेम व्यक्त करणारा रक्षाबंधन हा सण आज देशभरात साजरा होत आहे. या दिवशी बहिण भावाचे औक्षण करते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे तिला वचन देतो. याशिवाय बहिणीला ओवाळणी म्हणून भावाकडून ओवाळणी अर्थात छानशी भेटवस्तूही मिळते. काळानुसार या सणाचेही रूपडं पालटत आहे. सध्याचे युग डिजिटल युग आहे. त्यामुळे एका बहिणीने या आधुनिक युगाला साजेसे रक्षाबंधन साजरे करून भावाकडून ओवाळणी घ्यायची असे ठरवले. यासाठी तिने रचलेली शक्कल अतिशय अनोखी असून साऱ्यांनाच भुरळ घालणारी आहे.

हल्ली बहुतांश लोकं मोबाईल किंवा नेटबँकिंगच्या माध्यमातून पैशांच्या देवाणघेवाणीचे व्यवहार करतात. हातात पैसे नसले, तरीही आपण मोबाईल फोनमध्ये क्यूआर कोड स्कॅन करून यूपीआय पेमेंटद्वारे पैसे ट्रान्सफर करू शकतो. एका मुलीने हाच मुद्दा लक्षात घेऊन, चक्क आपल्या मेहंदीमध्येच क्यूआर कोडचं डिझाईन तयार केलं आहे. याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. यासाठी तिने चक्क क्यूआर कोडची मेंदी काढली आहे. व्हिडिओमध्ये मुलीच्या हातावर क्युआर कोड दिसून येत आहे. तिचा भाऊ कोड स्कॅन करून तिला रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून पैसे ट्रान्सफर करीत आहे. आपण देखील या प्रकारची मेहेंदी डिझाईन काढून भावाला सरप्राईज देऊ शकता. सोशल मिडियावर या मेंदीची जोरदार चर्चा सुरू आहे.

हा व्हिडिओ फेक असल्याचं काहींचं म्हणणं आहे. तर काही जण या व्हिडिओचं कौतुक करताना दिसून येत आहेत. ‘फेक असो वा खरं, ही आयडिया खरंच भारी आहे’ असं एका यूजरने म्हटलं आहे, तर दुसऱ्याने ‘कलाकाराला ११ तोफांची सलामी दिली पाहिजे.’असं कमेंट केलं आहे, एकाने तर ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेमुळे काय काय पहावं लागणार आहे’, असंही म्हटलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.