राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची बांधणी सुरू होत आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केल्याने मुंबईच्या अध्यक्षपदासाठी कार्याध्यक्ष राखी जाधव यांचा नाव जवळपास निश्चित झाले होते, मात्र राखी जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत असताना त्यांची वाट, मात्र आता तुरुंगातून जामिनावर सुटून आलेल्या नवाब मलिक यांच्यामुळे अडली गेली आहे.
पक्षात आता राखी जाधव यांच्याऐवजी नवाब मलिक यांच्या नावालाच मुंबई अध्यक्ष पदासाठी अधिक पसंती असल्याने नवाब मलिक यांना मुंबई अध्यक्ष बनवण्याचे हालचाली सुरू असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे नवाब मलिक हे आता मोठ्या पवारांसोबत राहतात ही छोट्या पवारांसोबत जातात, याकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.
(हेही वाचा – Raksha Bandhan Special: रक्षाबंधन ओवाळणीसाठी बहिणीने लढवली अनोखी शक्कल, हातावर काढला क्यू आर कोड)
राष्ट्रवादी काँग्रेस मधूनही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार आणि पदाधिकारी बाहेर पडले असून त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाच्या घड्याळ चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदार आणि पदाधिकारी यांच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांचाही समावेश आहे. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर हे अध्यक्ष पद रिक्त होते. त्यानंतर महापालिकेतील या पक्षाच्या गटनेत्या राखी जाधव आणि सिद्धिविनायक मंदिर न्यासा चे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे यांना प्रत्येकी तीन लोकसभा विधानसभेची जबाबदारी देत त्यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती;परंतु अजित पवार यांच्यासह आमदार पदाधिकारी सोडून गेले, यामध्ये त्यांच्यासोबत नरेंद्र राणे हेही गेल्याने मुंबई अध्यक्ष पदासाठी राखी जाधव यांच्या दावा पक्का झाला होता.
राखी जाधव यांची या पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदासाठी नाव निश्चित होवून त्याची अधिकृत घोषणा होण्याचे जवळपास अंतिम टप्यात असतानाच नवाब मलिक हे जेलमधून बाहेर आले. त्यामुळे राखी जाधव यांच्या मुंबई अध्यक्षपदाच्या निवडीचा निर्णय लांबणीवर पडला. मिळालेल्या माहितीनुसार,मलिक हेच मुंबई अध्यक्षपदा पात्र असल्याचे पक्षातील नेत्यांचे म्हणणं आहे. आणि त्यामुळेच राखी जाधव यांचे नाव बाजूला ठेवून त्यांच्या नावाची घोषणा केली जावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र नवाब मलिक हे सध्या शरद पवार यांच्यासोबत आहेत की अजित पवार यांच्यासोबत… याबाबतची भूमिका स्पष्ट नसल्याने तसेच मलिक यांनी आपण स्वतः या पदासाठी इच्छुक असल्याचे न सांगितल्याने लांबणीवर पडला होता. पण येणाऱ्या ३१ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील कार्यकरणीची बैठक पार पडणार असून यामध्ये कोणाच्या नावाला अधिक पसंती असल्याचे स्पष्ट होईल. त्यांना पुन्हा अध्यक्ष बनवल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त नगरसेवक निवडून आणता येतील, असा विचार पुढे आला आहे.
नवाब मलिक यांनी २०१७ च्या निवडणुकीत नऊ नगरसेवक निवडून आणले होते. या नऊपैकी राखी जाधव आणि हारून शेख यांची पत्नी ज्योती या स्वतःच्या बळावर निवडून आल्या होत्या. त्यामुळे ही बाब लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसला सात नगरसेवक निवडून आणण्यात नवाब मलिक यांचा मोठा हात होता,हे स्पष्ट होत आहे . त्यामुळे पक्षश्रेष्ठीनी नवाब मलिक यांचे नाव मुंबई अध्यक्ष पदासाठी सुचवून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, राखी जाधव यांनाही मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्याची प्रचंड इच्छा असून खासदार आणि पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे त्यांच्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जाते. परंतु नवाब मलिक आणि राखी जाधव यांच्यातून पक्षातील नेत्यांचे वजन हे कोणाच्या दिशेने झुकत आहे आणि कुणाच्या गळ्यात या अध्यक्षपदाची माळ पडेल याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.त्यामुळे नवाब मध्ये यांना अध्यक्षपदाची निवड झाल्यास त्यांचा पवार गटाकडे जाण्याचा मार्ग बंद होईल आणि ते या ठिकाणी राहतील, मात्र मलिक यांना अध्यक्ष बनवल्यास राखी जाधव या पक्षात राहतील का किंवा त्या अन्य कोणत्या पक्षात जातील का याबाबतही अनेकांच्या मनात शंका कुशंका निर्माण होत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community