आर्टिफिशियल इंटेलिजेंस, हा फक्त एक शब्द नसून हा एक बदल आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे जगाचे रूप बदलणार आहे. सध्या या तंत्रज्ञानाच्या वापराने प्रत्येक क्षेत्रात अनेक बदल होऊन, दिवसागणिक विविध क्षेत्रांतील अनेक गोष्टींच्या विकासात आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा मोलाचा वाटा आहे.
केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरममध्ये देशातील पहिली एआय शाळा ‘शांतीगिरी विद्याभवन’ उघडण्यात आली आहे. देशाचे माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मंगळवार, २२ ऑगस्ट २०२३ ला या एआय स्कूलचे उद्घाटन केले. भारतातील पहिली एआय शाळा इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. ही शाळा एआय- लर्निंग एंजिन (ILE) यूएसए आणि वैदिक- ई शाळा यांच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. एआय टूल्सच्या मदतीने, शैक्षणिक अभ्यासक्रमाची मांडणी आणि रचना, विद्यार्थांचे मूल्यांकन आणि शाळेतील पैलूंमध्ये या तंत्राचा वापर केला जाणार आहे.
(हेही वाचा – Aksai China : अक्साई चीनमध्ये चीनची युद्धाची तयारी सुरूच ! केल्या ‘या’ कारवाया ! )
शांतीगिरी विद्याभवन एआय स्कूल मधील अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, या शाळेत पारंपारिक अध्यापन पद्धती व्यतिरिक्त, मुलांना एआयच्या मदतीने प्रगत साधने पुरवली जातील. विद्यार्थ्यांना शिकण्याची ही नवीन पद्धत खरोखर चांगले शिक्षण देणार असून, भविष्यातील अनेक आव्हानांसाठी ही नवी पिढी तयार असणार आहे.
ही आहे शाळेची वैशिष्ट्ये :
१. ही एआय शाळा ८वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आली आहे.
२. या शाळेत मुलांना अनेक शिक्षक, विविध स्तरांची चाचणी, अभियोग्यता चाचणी, समुपदेशन, करिअर नियोजन आणि स्मरण तंत्र याविषयी माहिती दिली जाणार आहे.
३. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावरही भर दिला जाणर असून, मुलाखत कौशल्ये, ग्रूप डिस्कशन, गणित, लेखन कौशल्ये, इंग्रजी आणि इमोशनल वेल बिंग याबद्दलही माहिती दिली जाणार आहे.
४. शालेय परीक्षांव्यतिरिक्त, मुलांना JEE, NEET, CUET, CLAT, GMAT आणि IELTS सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी देखील तयार केले जाणार आहे.
५. या एआय शाळेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही शाळा विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यास मदत करते.
६. शिवाय, परदेशी विद्यापीठांमध्ये शिष्यवृत्ती मिळविण्यासाठीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे, ज्यामुळे हे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेऊ शकतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community