Raksha Bandhan Special : रक्षाबंधनानिमित्त रिक्षाचालकाची बहिणांना खास भेट, दरवर्षी मोफत प्रवास सुविधा

बहिणीला वाहतो आगळीवेगळी श्रद्धांजली

146
Raksha Bandhan Special : रक्षाबंधनानिमित्त रिक्षाचालकाची बहिणांना खास भेट, दरवर्षी मोफत प्रवास सुविधा
Raksha Bandhan Special : रक्षाबंधनानिमित्त रिक्षाचालकाची बहिणांना खास भेट, दरवर्षी मोफत प्रवास सुविधा

बहिण आणि भावाविषयी असलेल्या प्रेम आणि जिव्ह्याळाच्या अनेक कथा आपण वाचत आणि ऐकत असतो. या दिवशी प्रत्येक भावाबहिणीला एकमेकांसाठी काहीतरी करावे, असे वाटत असते. बहिणींसाठी काहीतरी आगळेवेगळे करण्याच्या उद्देशाने एक रिक्षाचालक दरवर्षी प्रत्येक रक्षाबंधनाला सकाळपासून सायंकाळपर्यंत त्याच्या रिक्षाने प्रवास करणाऱ्या सर्व महिला आणि मुलींना त्याच्या रिक्षातून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देतो.

जोधपूर येथील मदेरणा कॉलनीत राहणाऱ्या या रिक्षा चालकाचे नाव धनराज दाधीच असे आहे. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्येक बहिणीला भावाकडे घेऊन जाण्याची मोफत तो सेवा तो देतो. धनराजच्या बहिणीचे 5 वर्षांपूर्वी निधन झाले.तिच्या स्मरणार्थ ही सेवा करत असल्याचे तो सांगतो. रिक्षा चालवून तो त्याचा उदरनिर्वाह चालवतो, पण रक्षाबंधनाच्या दिवशी फोन करणाऱ्या प्रत्येक बहिणीला तिच्या भावाच्या घरी तो मोफत पोहोचवतो.

(हेही वाचा – Pulses Price Hike : टोमॅटोनंतर आता डाळींमुळे कोलमडणार महिन्याचे बजेट, वाचा वर्षभरात किती झाली भाववाढ… )

5 वर्षांपूर्वी धनराजची बेबी हिचं निधन झालं होतं. त्या दिवसापासून त्यांनी प्रत्येक रक्षाबंधनाला प्रत्येक बहिणीला त्याच्या रिक्षातून मोफत प्रवास करण्याची शपथ घेतली. तेव्हापासून आजपर्यंत सर्व बहिणींसाठी त्याने रक्षाबंधनाच्या दिवशी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी आठवड्यापूर्वी सोशल मिडियावर फेसबुक, व्हॉट्सअॅपवर रक्षाबंधनानिमित्त मोफत प्रवासाचा संदेश तो देतो तसेच आपल्या रिक्षावरही मोफत प्रवासाचे पोस्टर तो चिकटवतो. फेसबुकवर सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महिला प्रवाशांना मोफत प्रवासाचा संदेश देतो. संपर्क करण्यासाठी पोस्टरवर आपला मोबाईल नंबरही त्याने लिहिला आहे.

या वैशिष्ट्यपूर्ण योजनेबाबत त्याचे म्हणणे आहे की, त्याची बहिण या जगात नाही, मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक स्त्री ही त्याची बहिण असते. त्यांच्यासाठी मोफत प्रवासाची सेवा केल्याने त्याला आनंद मिळतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.