स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांचे बुधवारी ३० ऑगस्टला अमरावतीमध्ये आगमन झाले. त्यांच्या स्वागताला अमरावती नगरी सजल्याचे दृष्य पहायला मिळाले. रस्त्याच्या दुतर्फा त्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते. वीर सावरकर आणि अमरावतीचे नाते अतूट असे आहे. १९३७ आणि १९३९ मध्ये त्यांनी अमरावतीचा दौरा केला होता. अमरावतीत स्वातंत्र्यचळवळीची रुजवात सावरकरांनी केली. येथील स्वातंत्र्यसैनिक डॉ. गणेश पिंपरकर यांना सोबत घेऊन त्यांनी स्थानिकांना स्वातंत्र्याविषयी जागरूक केले. त्यामुळे सावरकरांच्या आठवणी येथील नागरिकांनी आजही जतन करून ठेवल्या आहेत.
(हेही वाचा – Pulses Price Hike : टोमॅटोनंतर आता डाळींमुळे कोलमडणार महिन्याचे बजेट, वाचा वर्षभरात किती झाली भाववाढ…)
सावरकरांचा हा अनमोल ठेवा त्यांच्या वारसांना सुपूर्द करण्यासाठी अमरावतीकरांनी त्यांचे नातू रणजित सावरकर यांना निमंत्रित केले. त्याला मान देऊन ३० ऑगस्टला रणजित सावरकर अमरावतीत दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागताला स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी अमरावतीमध्ये भव्य रॅली काढून सावरकरांच्या आठवणींचा जागर केला जाणार आहे. रणजित सावरकर (Ranjit Savarkar) त्यात सहभागी होतील.
भारताचा इतिहास पराभवाचा नाही !
अमरावतीमधील शासकीय विश्रामगृहात बुधवारी सायंकाळी सावरकरप्रेमींनी रणजित सावरकर यांची भेट घेतली. यावेळी रणजित सावरकर यांनी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. या वेळी रणजित सावरकर यांच्या समवेत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सहकार्यवाह स्वप्नील सावरकर आणि विश्वस्त शैलेंद्र चिखलकर हेही उपस्थित होते. या प्रसंगी सुधीर सूर्यवंशी, जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना (उबाठा), पराग गुडदे, शहर प्रमुख, अमरावती शिवसेना (उबाठा), निलेश टवलारे, राज गणेशकर, हिंदू जनजागृती समिती, अमरावती, विनय मोटवानी, भारत रक्षा मंच, हेमंत मालवीय, राज गणेशकर हिंदू क्रांती सेना, अतुल खोंड, भगवे वादळ, वृंदा मुक्तेवार, शिवसेना महानगर अध्यक्षा, बरखा बोज्जे, तुषार वनखेडे, ऍड राजेंद्र पांडे, नीता तिवारी, ऍड. रश्मी तायडे आदी उपस्थित होते.
इतिहासाची पाने उलगडताना सावरकर म्हणाले,
- भारताची पूर्वीची स्थिती आणि आजचे सामर्थ्य यात अभूतपूर्व बदल झाले आहेत. आपला इतिहास हा पराभवाचा इतिहास नाही. भारतावर अनेक आक्रमणे झाली, पण आपण त्यांना निकराचा लढा देत परतवून लावले.
- जेव्हा फाळणी झाली, तेव्हा भारतातील मुस्लिमांची संख्या ८ टक्के होती, आता ती २२ टक्के झाली आहे. भारत अस्थिर करण्यासाठी आजकाल अनेक कुप्रवृत्ती पुढे येऊ लागल्या आहेत. देशात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अलीकडे जिहादची व्याख्या बदलली आहे.
- राहुल गांधीवर आम्ही कधीच जाणीवपूर्वक टीका केली नाही. पण, तो मनुष्य वीर सावरकरांविषयी नको ते गैरसमज पसरवत आहे.
- त्यामुळे समाजासमोर चुकीच्या गोष्टी जाऊ नयेत, यासाठी आम्ही त्यांच्या टीकेला अभ्यासपूर्ण उत्तरे देत आहोत, असेही रणजित सावरकर म्हणाले. (Ranjit Savarkar)
रणजित सावरकर यांना बांधल्या राख्या
रणजित सावरकर यांच्या स्वागताला अमरावतीमधील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रक्षाबंधनाचे औचित्य साधून त्यांनी रणजित सावरकर यांना राख्या बांधल्या. रक्षाबंधनाला वीर सावरकरांचे वंशज भेटण्याचा योग येणे हे आमचे भाग्य असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. हिंदु जनजागृती समिती, भारत रक्षा मंच, हिंदू क्रांती सेना, भगवे वादळ संघटनेच्या महिला सदस्य यावेळी उपस्थित होत्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community