Electric Double Decker Bus : बेस्टच्या ताफ्यात आणखी ४ वातानुकूलित दुमजली बस

समार्ग क्र. ए ११५ वर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एन. सी. पी. ए. या दरम्यान या बसेस सुरु आहेत.

237
Electric Double Decker Bus : बेस्टच्या ताफ्यात आणखी ४ वातानुकूलित दुमजली बस
Electric Double Decker Bus : बेस्टच्या ताफ्यात आणखी ४ वातानुकूलित दुमजली बस

बेस्टच्या ताफ्यात आणखी ०४ वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली (डबल डेकर) बसगाड्या दाखल झाल्या असून या सर्व दुमजली बसगाड्यांच्या फेऱ्या शुक्रवारी २५ ऑगस्ट २०२३ पासून सकाळी ०८.४५ वाजल्यापासून दर ३० मिनिटांच्या अंतराने होत आहेत. बसमार्ग क्र. ए ११५ वर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एन. सी. पी. ए. या दरम्यान या बसेस सुरु आहेत, तसेच लवकरच आणखी ०८ वातानुकूलित दुमजली बसगाडयाही याच मार्गावर धावल्या जाणार असल्याचे बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात यापुर्वीच म्हणजे २१ फेब्रुवारी २०२३ रोजी वातानुकूलित-दुमजली इलेक्ट्रिक बस गाडी दाखल झाल्या आहेत. याप्रमाणे १२ वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या बसमार्ग क्र ए-१३८ व ए-११५ या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एन. सी. पी. ए. या दरम्यान प्रवर्तित करण्यात येत आहेत. या वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बस सेवेला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद प्राप्त होत आहे.

(हेही वाचा – Death Certificate : स्मशानात अंत्यविधीनंतर मिळणार मृत्यू प्रमाणपत्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय)

या बसगाड्या पर्यावरणपूरक असून, या बसगाड्यांमधून कोणत्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायु प्रदूषण होत नाही. वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसमध्ये दोन्ही बाजूने स्वयंचलित प्रवेशद्वारे असल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होत आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये सीसीटीव्हीची सुविधा देण्यात आली आहे. या शिवाय प्रवाशांच्या सोयीकरिता मोबाइल चार्जिंगची व्यवस्थाही या बसमध्ये आहे. प्रवाशांना या दुमजली बसगाडीमध्ये प्रवास करताना प्रवाशांना अतिरिक्त बस भाडे आकारले जाणार नाही तर इतर सर्वसाधारण एकमजली बसगाड्यांप्रमाणे प्रवासाचे भाडे आकारले जाणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी पुढील कालावधीत आणखी नविन वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्यांची संख्या वाढविण्यात येणार असून कुर्ला आगारातील बसमार्गांवरही १० वातानुकूलित इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या सुरु केल्या जाणार असल्याचे बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.