I.N.D.I.A. vs Mahayuti : मुंबईत बैठकांचं सत्र; इंडिया आघाडी आणि महायुतीची एकाच दिवशी बैठक

208
I.N.D.I.A. vs Mahayuti : मुंबईत बैठकांचं सत्र; इंडिया आघाडी आणि महायुतीची एकाच दिवशी बैठक

केंद्रातील भाजपच्या सत्तेला हरवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी (I.N.D.I.A. vs Mahayuti) एकत्र येऊन लढायचे ठरवले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज म्हणजेच गुरुवार ३१ ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी २८ पक्षांचे जवळ जवळ ६३ नेते येण्याची शक्यता आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

इंडियाच्या बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता

आजच्या बैठकीमध्ये (I.N.D.I.A. vs Mahayuti) जागावाटप या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण, जर ही आघाडी एकजूट ठेवायची असेल तर, प्रत्येक पक्षाला योग्य तो न्याय जागा वाटपात मिळावा अशी अपेक्षा आघाडीतील सर्वच पक्ष करत आहेत. अशा परिस्थितीत जागा वाटपाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जागा वाटपाची चर्चा लवकरात लवकर करण्यात यावी असा सल्ला दिला आहे.

तसेच या बैठकीमध्ये (I.N.D.I.A. vs Mahayuti) इंडिया आघाडीचा लोगो जारी केला जाईल असेही सूत्रांनी सांगितले आहे. हा लोगो आघाडीच्या प्रचारात वापरला जाईल. मात्र पक्ष त्यांच्याच चिन्हावर लढतील.

तर दुसरीकडे या आघाडीचा विजय झाला तर पंतप्रधान कोण होणार? याविषयी देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत कोणीही काहीही जाहीर केले नसले तरी पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार? हे पाहणे उत्सुकतेचे असून आज याबाबत चर्चा किंवा निर्णय होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

(हेही वाचा – Ind vs Pak : आशिया चषकाच्या भारत – पाक लढतीत रोहीत आणि विराटला खुणावतायत वैयक्तिक विक्रम )

आघाडीच्या आजच्या बैठकीला (I.N.D.I.A. vs Mahayuti) प्रत्युत्तर म्हणून महायुतीचीही मुंबईत आज आणि उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे. इंडिया आघाडीची बैठक विमानतळाजवळील ‘ग्रॅण्ड हयात’ या पंचतारांकित हॉटेलामध्ये होणार आहे. तर महायुतीची बैठक वरळीमध्ये पार पडणार आहे.

तर आज (३१ ऑगस्ट) संध्याकाळी ८ वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सर्व प्रमुख नेते आणि मंत्री यांच्यासह भोजन कार्यक्रम व चर्चा असा कार्यक्रम ठरलेला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह आरपीआय (आठवले गट), आरपीआय (जोगेंद्र कवाडे गट), बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, जन सुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर, प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत. हे सर्व घटक पक्ष या बैठकांना (I.N.D.I.A. vs Mahayuti) उपस्थित राहणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.