औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर (Bombay High Court) आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर केंद्राने देखील त्याला मंजुरी दिली. मात्र, या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आतापर्यंत अनेक सुनावण्या देखील झाल्या आहेत. दरम्यान, या नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिकेवर ४ ऑक्टोबरला आणि उस्मानाबादच्या याचिकेवर ५ ऑक्टोबरला अंतिम सुनावणी होणार आहे.
राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यंमत्री पदाचा राजीनामा देण्याच्या काही तासापूर्वी उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Bombay High Court) निर्णय घेतला. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यांनी उद्धव ठाकरेंचा निर्णय रद्द करून औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्याचा पुन्हा नव्याने निर्णय घेतला. हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता. तर केंद्राने देखील नामांतराला परवनगी दिली होती. मात्र, याच निर्णयाला विरोध झाला आणि नामांतर करण्याच्या शासनाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल करण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा – High Court : हॅकर्स चा आता थेट सर्वोच्च न्यायालयावर डोळा)
न्यायालयाने (Bombay High Court) या प्रकरणी दोन्ही बाजू जाणून घेतल्या आहेत. ज्यात सरकराने देखील आपली भूमिका वेळोवेळी मांडली आहे. तर, औरंगाबादच्या याचिकेवर ४ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी आणि उस्मानाबादच्या याचिकेवर ५ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठात अंतिम सुनावणी होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community