Metabolic Syndrome : देशातील २० ते ३० टक्के व्यक्तींना जडलाय ‘हा’ आजार

रुग्णाला दोन पेक्षा अनेक आजार जडल्यास त्याला मेटाबोलिक सिंड्रोमचे निदान होते.

287
Metabolic Syndrome : देशातील २० ते ३० टक्के व्यक्तींना जडलाय 'हा' आजार
Metabolic Syndrome : देशातील २० ते ३० टक्के व्यक्तींना जडलाय 'हा' आजार

भारतात मधुमेहाचे हृदयविकाराचे आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण वर्षागणीक वाढत असल्याची नोंद होत आहे. रुग्णाला दोन पेक्षा अनेक आजार जडल्यास त्याला मेटाबोलिक सिंड्रोमचे निदान होते. शरीरात विविध आजारांच्या समूहाला मेटाबोलिक सिंड्रोम असे म्हटले जाते. वाढत्या मेटाबोलिक सिंड्रोमच्या आजारामुळे रुग्णांना यकृताचा आजार होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोविडनंतर वैद्यकीय साक्षरता वाढली. अनेक जण आता नियमितपणे वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करतात. बरेचदा सोनोग्राफीच्या चाचणीत यकृत फेटी होत असल्याचे निदान होत आहे.

शरीरातील पचन संस्थेतील सर्व क्रियांमध्ये यकृत महत्त्वाची भूमिका बजावते. याकरिता यकृताची काळजी घेणे आवश्यक ठरते. यकृताच्या दैनंदिन पचनकार्यात अडथळा निर्माण झाल्यास संपूर्ण शरीरावर दुष्परिणाम होतो. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू न पिणाऱ्या रुग्णांचेही यकृत खराब होत आहे. याला वैद्यकीय भाषेत नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणतात. यकृताच्या आजारावर आता त्वरित निदान करणे शक्य आहे. वाढत्या यकृताच्या आजारामुळे आता अनेक रुग्णालयात फायब्रोस्कॅन तपासणी उपलब्ध आहे. सोनोग्राफी सारखीच फायब्रोस्कॅन तपासणी केली जाते. औषधांच्या उपचाराने या आजारावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. अनेकदा रुग्ण केस हातापलीकडे गेल्यानंतर येतात. या रुग्णांमध्ये सिरोसिसचे निदान होते. अनेक वेळा मग रुग्णांना डॉक्टरांच्या नियमित फेऱ्या आणि सतत चाचण्या कराव्या लागतात. यकृतामध्ये बिघाड झाल्यास यकृताच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेशिवाय पर्याय राहत नाही.

(हेही वाचा – Bombay High Court : छत्रपती संभाजी नगर नामांतरावर ४ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी)

याबाबतीत भारतीय वैद्यकीय परिषदेच्या अनेक डॉक्टरांनी जनजागृतीची आवश्यकता असल्याचे म्हटले. फॅटी लिव्हर वर वेळेत उपचार न केल्यास त्याचे रूपांतर लिव्हर फायब्रोसिस व नंतर लिव्हर सिरॉईसिसमध्ये होते. फॅटी लिव्हरमुळे हॅपेटायटिससारखे गंभीर आजार होण्याचीही भीती असते. फॅटी लिव्हरचे निदान झाल्यास जीवनशैलीत आवश्यक बदल करावा लागतो. जंक फूड टाळणे, योग्य आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, वजन कमी करणे इत्यादींचे काटेकोरपणे पालन केल्यास फॅटी लिव्हरची समस्या दूर होते. दारू पिणाऱ्यांनी दारूचे सेवन टाळावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.