Overconsumption Of Salt : अतिरिक्त मिठाच्या सेवनाने मिळते आजारांना निमंत्रण

प्रत्येक भारतीय दिवसाला सरासरी १० ते १२ ग्रॅम मीठ खात असल्याचे डॉक्टरांच्या पाहणीतून दिसून आले.

150
Overconsumption Of Salt : अतिरिक्त मिठाच्या सेवनाने मिळते आजारांना निमंत्रण
Overconsumption Of Salt : अतिरिक्त मिठाच्या सेवनाने मिळते आजारांना निमंत्रण

भारतीयांच्या दररोजच्या जेवणात मिठाचे अतिरिक्त सेवन होत असल्याचे अनेक वैद्यकीय संशोधन अहवालातून समोर आले आहे. प्रत्येक भारतीय दिवसाला सरासरी १० ते १२ ग्रॅम मीठ खात असल्याचे डॉक्टरांच्या पाहणीतून दिसून आले. मिठाच्या अतिरिक्त सेवनाने शरीरात विविध आजारांना निमंत्रण मिळत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

भारतीयांच्या जीवनात बरेचदा अतिरिक्त मीठ वापरले जाते. बदलत्या जीवनशैलीमुळे फास्ट फूडचे व्यसन लागले आहे. प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थात चवीसाठी अतिरिक्त मीठ टाकावे लागते. मिठाच्या अतिरिक्त सेवनामुळे एकापेक्षा अनेक आजार जडण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली.

(हेही वाचा – Sharad Pawar : शरद पवार यांचं वय झालं आहे, त्यांनी आता निवृत्त व्हावं.)

मिठाच्या अतिरिक्त सेवनाने ‘या’ आजारांची भीती –
  • उच्च रक्तदाब.
  • किडनीचे विकार.
  • हृदयविकार.
  • मेंदूचे विकार.
  • लठ्ठपणा.
शरीरात मीठाचे प्रमाण वाढण्याचे कारण –
  • दैनंदिन भारतीय जेवणात पापड आणि लोणच्याचे सेवन असेल तर शरीरात मिठाचे प्रमाण वाढू शकते. पापड टिकवण्यासाठी तसेच पदार्थांची चव वाढविण्यासाठी अतिरिक्त मीठ वापरले जाते. लोणच्यात मीठ आणि तेल या दोन्हीचे प्रमाण जास्त असते.
  • प्रक्रिया केलेले पॅक बंद पदार्थ खाल्ल्यास गंभीर आजार होण्याचीही भीती असते. सॉस, रेडीमेड अन्नपदार्थ यात मीठ जास्तच असते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.