Mumbai University : मुंबई विद्यापीठातील धक्कादायक प्रकार; एम. कॉमच्या तिसऱ्या सत्राच्या 10 हजार उत्तरपत्रिका तपासल्याच नाहीत

विद्यापीठाच्या कंत्राटदाराने तिसऱ्या सत्राच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविल्याच नसल्याचे उघड

133
Mumbai University : मुंबई विद्यापीठातील धक्कादायक प्रकार; एम. कॉमच्या तिसऱ्या सत्राच्या 10 हजार उत्तरपत्रिका तपासल्याच नाहीत
Mumbai University : मुंबई विद्यापीठातील धक्कादायक प्रकार; एम. कॉमच्या तिसऱ्या सत्राच्या 10 हजार उत्तरपत्रिका तपासल्याच नाहीत

मुंबई विद्यापीठात (Mumbai University) दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) एम. कॉम. तिसऱ्या सत्राच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी न करता पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यापीठाने आयडॉलच्या एम. कॉम. परीक्षेच्या चौथ्या म्हणजेच अंतिम सत्राच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण केली. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करताना तिसऱ्या सत्राच्या विद्यार्थ्यांसमोरील अडचणी वाढल्यापूर्ण झाली नसल्याचे समोर आले. विद्यापीठाच्या अशा गलथान कारभारामुळे एम. कॉमच्या 10 हजार उत्तरपत्रिका 141 हून अधिक दिवस राहिल्या आहेत.

(हेही वाचा – Overconsumption Of Salt : अतिरिक्त मिठाच्या सेवनाने मिळते आजारांना निमंत्रण)

विद्यापीठाच्या (Mumbai University) आयडॉलच्या एम. कॉम. अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या सत्राच्या परीक्षा 10 एप्रिलला झाल्या. त्यानंतर जुलैमध्ये चौथ्या सत्राच्या परीक्षा झाल्या. मात्र, विद्यापीठाच्या कंत्राटदाराने तिसऱ्या सत्राच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविल्याच नसल्याचे समोर आले आहे. विद्यापीठाने एम.कॉम. अभ्यासक्रमाच्या चौथ्या सत्राच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण केली आहे. मात्र तिसऱ्या सत्राच्या १० हजारांहून अधिक उत्तरपत्रिकांची तपासणी अद्याप बाकी असल्याने अंतिम निकाल जाहीर करणे विद्यापीठाला शक्य नाही. पदव्युत्तर अभ्यासक्रमात असा गोंधळ झाल्याने विद्यापीठाची नाचक्की होत आहे. आता या उत्तरपत्रिका तपासणार कधी आणि निकाल लागणार कधी, असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणाऱ्या या परीक्षांची अशा पद्धतीने हेळसांड केल्याबद्दल विद्यार्थ्यांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.

विद्यार्थ्यांसमोरील अडचणी वाढल्या

एम. कॉम परीक्षेचा निकाल लागत नसल्याने विद्यार्थ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पीएचडी करायची त्यांना या विलंबाचा फटका बसू शकतो. तृतीय सत्रात एखादा विषय राहिल्यास त्याच्या पुनर्मूल्यांकनासाठी आणि पुनर्परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना काही महिन्यांची वाट पाहावी लागेल. त्यातून अडचणीत पुन्हा भर पडणार आहे. दरम्यान, या प्रकरणी जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेचे (शिंदे गट) उपसचिव सचिन पवार यांनी केली आहे.

एम. ए.च्या निकालांनाही विलंब

विद्यापीठाच्या जानेवारी सत्राच्या एम. ए. अभ्यासक्रमाच्या चौथ्या सत्राची परीक्षा २८ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान पार पडली. या परीक्षेला १४७ दिवस उलटून गेले, तरी अद्याप निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रारी केल्या. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून निकाल लवकरच जाहीर केला जाईल, असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे. (Mumbai University)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.