Avoid Maida Flour : हाडे कमकुवत झाली असेल तर ‘हा’ पदार्थ खाणे टाळा

फास्टफूडच्या अतिसेवनाने तरुणांमध्ये हाडांची समस्या उद्भवत आहे, अशी तक्रार डॉक्टरांनी केली.

222
Avoid Maida Flour : हाडे कमकुवत झाली असेल तर 'हा' पदार्थ खाणे टाळा
Avoid Maida Flour : हाडे कमकुवत झाली असेल तर 'हा' पदार्थ खाणे टाळा

तरुणांमध्ये वाढत्या हाडांच्या विकाराबद्दल डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. फास्टफूडच्या अतिसेवनाने तरुणांमध्ये हाडांची समस्या उद्भवत आहे, अशी तक्रार डॉक्टरांनी केली. फास्टफूड पदार्थांमध्ये मैद्याचा वापर सर्रास केला जातो. स्वततच्या फास्टफूडच्या सेवनाने तरुणांची हाडे कमकुवत होत असून, तिशीतच तरुणांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. पराठा, पुरी, कुलचा, नान, पिझ्झा, मोमोज, बर्गर, केक आणि बिस्किटमध्ये मैद्याचा वापर केला जातो. सकाळच्या न्याहारीत बिस्किटचे सेवन, जेवणात पराठा, कुलचा, पिझ्झा आदी पदार्थांचे सतत सेवन राहिल्यास शरीरावर दुष्परिणाम होतो. अतिरिक्त मैद्याचे पदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

(हेही वाचा – Global AI Conference : भारतात होणार पहिली ‘ग्लोबल इंडिया एआय 2023’ परिषद)

कोविडकाळापासून अनेक जण मैद्याचा वापर करून केक घरीच बनवायला शिकले आहेत. सणासुदीला खाद्यपदार्थ बनवण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो. बाजारात मैद्याची मागणी सातत्याने वाढतच आहे, असे दुकानदार सांगतात. सेंट जॉर्जेस रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर विनायक सावर्डेकर यांनी मैदाच्या अतिरिक्त वापराबद्दल चिंता व्यक्त केली. मैद्याचे अतिरिक्त पदार्थ खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवतात. तरुण बद्धकोष्ठतेच्या समस्यांची तक्रार घेऊन आल्यास आम्ही त्यांना तातडीने मैद्याचे पदार्थ बंद करण्यास सांगतो, असेही ते म्हणाले.

मैद्याचे दुष्परिणाम –

मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, बद्धकोष्ठता आणि हाडे कमकुवत होणे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.