Indian Space Economy : भारतीय अंतराळ अर्थव्यवस्थेची क्षमता १०० अब्ज डॉलर्स होईल – डॉ. जितेंद्र सिंह

ऑक्टोबरमध्ये गगनयान अंतराळ अभियानाची चाचणी होणार

195
Indian Space Economy : भारतीय अंतराळ अर्थव्यवस्थेची क्षमता १०० अब्ज डॉलर्स होईल - डॉ. जितेंद्र सिंह

भारतीय अंतराळ अर्थव्यवस्थेची (Indian Space Economy) क्षमता २०४० पर्यंत सुमारे १०० अब्ज डॉलर्स इतकी असेल. जी एक प्रचंड मोठी झेप ठरेल आणि जगाला आता भारताकडून हीच अपेक्षा आहे, असा विश्वास केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला. डाॅ, सिंह एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

डाॅ. सिंह म्हणाले की, एकंदरीत भारताची अंतराळ अर्थव्यवस्था (Indian Space Economy) आज सुमारे ८ अब्ज डॉलर्स (जागतिक बाजारपेठेचा 2% वाटा) इतकी आहे, पण संपूर्ण जग त्याची वाढती गती ओळखत असल्यामुळे जुन्या अंदाजानुसार २०४० पर्यंत ती सुमारे ४० अब्ज डॉलर्स इतकी असेल. मात्र, साधारण २ – ३ दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या ADL (आर्थर डी लिटल) अहवालानुसार २०४० पर्यंत आपली क्षमता सुमारे १०० अब्ज डॉलर्स होण्याची अपेक्षा आहे, कारण आपण खूप वेगाने पुढे जात आहोत, आपण उपग्रह प्रक्षेपणे देखील वारंवार करत आहोत.

अंतराळ संशोधन क्षेत्रात (Indian Space Economy) भारताने घेतलेली मोठी झेप जगाने मान्य केली असून, या क्षेत्राला भूतकाळाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे या गोष्टीला मोठी चालना मिळाली आहे.

(हेही वाचा – Global AI Conference : भारतात होणार पहिली ‘ग्लोबल इंडिया एआय 2023’ परिषद)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्षेत्राबाबतच्या भूतकाळातील चुकीच्या संकल्पनांना छेद दिला असून, हे यापूर्वी का होऊ शकले नाही, याचे मला आश्चर्य वाटते, असे डॉ. सिंह म्हणाले. त्याच वेळी भौतिक पातळीवर या निर्णयामुळे अधिक निधी (Indian Space Economy) उपलब्ध झाला असून, या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी खासगी क्षेत्र आणि उद्योगांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. अवघ्या 3-4 वर्षात आपल्याकडे 150 पेक्षा जास्त स्टार्टअप्स सुरु झाले आहेत.”

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, इस्रोने (ISRO) ३८० पेक्षा जास्त परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत, अमेरिकन उपग्रह प्रक्षेपित करून २५० दशलक्ष युरो आणि १७० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली आहे.

इस्रोची (Indian Space Economy) सूर्यावरील पहिली मोहीम “आदित्य-एल1” २ सप्टेंबर रोजी सुरू झाल्यानंतर, ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात त्याचे गगनयान या अंतराळ अभियानाची चाचणी केली जाईल, अशी माहिती डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. त्यानंतर होणाऱ्या पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या दुसऱ्या चाचणीत “व्योमित्र” नावाची एक महिला रोबो पहिल्या मानवी मोहिमेपूर्वी गगनयानसोबत जाईल, त्यानंतर तीन अंतराळ वीरांचा समावेश असलेले गगनयान अवकाशात जाऊ शकेल, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

अंतराळ संशोधनात (Indian Space Economy) भारताची इतर कोणत्याही राष्ट्राशी स्पर्धा नाही, असे सांगत भारताचे अंतराळ संशोधन,अणुऊर्जा कार्यक्रम निर्मिती करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या संकल्पनेनुसार होत असून पूर्णपणे विधायक कार्यासाठी आहेत,याचा डॉ जितेंद्र सिंग यांनी पुनरुच्चार केला. इस्रो (ISRO), आघाडीच्या अंतराळ संस्थांसोबत सहकार्य करत आहे तसेच खाजगी परदेशी संस्था आणि शैक्षणिक संस्थांचे अनेक उपग्रह अंतराळ कक्षेत सोडले गेले असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

रेल्वे, महामार्ग, कृषी,जलसंवर्धन, स्मार्ट सिटीज, टेलीमेडिसिन आणि रोबोटिक सर्जरी यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये अंतराळ तंत्रज्ञानाचे (Indian Space Economy) उपयोग होत असल्याचा संदर्भ देत, त्यामुळे सर्वसामान्यांचे आयुष्य सुखकर होण्यात मदत झाली असे सांगत डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, की अंतराळ तंत्रज्ञानाने जणूकाही प्रत्येकाच्या घराघराला स्पर्श केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.