- ऋजुता लुकतुके
रिलायन्सच्या मालकीच्या वायकॉम १८ ला आयपीएल सह देशांतर्गत मालिकांचे पुढील पाच वर्षांचे प्रसारणाचे हक्क मिळाले आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी तशी घोषणा केली. रिलायन्सच्या वायकॉम १८ कंपनीने क्रिकेट प्रसारणाच्या बाबतीत मोठी मजल मारताना बीसीसीआय अंतर्गत होणाऱ्या आयपीएल, डब्ल्यूपीएल तसंच देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालिकांचे टीव्ही तसंच डिजिटल प्रसारणाचे हक्क जिंकले आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गुरुवारी याविषयीची घोषणा केली. हे हक्क जून २०२३ ते सप्टेंबर २०२८ असे पाच वर्षांसाठी असतील.
यंदा प्रसारण हक्कांसाठीचा लिलाव ऑनलाईन पद्धतीने पार पडला. आणि त्याचा निकालही जय शाह यांनी ट्विटरवर जाहीर केला. ‘वायकॉम १८ चे आभार. त्यांना डिजिटल बरोबरच टीव्ही प्रसारणाचे हक्कही आता मिळाले आहेत.’ अशी घोषणा जय शाह यांनी केली.
Congratulations @viacom18 🤝 for winning the @BCCI Media Rights for both linear and digital for the next 5 years. India Cricket will continue to grow in both spaces as after @IPL, and @wplt20, we extend the partnership @BCCI Media Rights as well. Together we will continue to…
— Jay Shah (@JayShah) August 31, 2023
त्याचबरोबर इतकी वर्षं बीसीसीआयचे मीडिया पार्टनर असलेल्या डिस्नी हॉटस्टारचेही शाह यांनी आभार मानले. ‘स्टार इंडिया आणि डिस्नी हॉटस्टारचेही आभार. क्रिकेट भारताबरोबरच जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मोलाची साथ दिली आहे,’ असं जय शाह यांनी म्हटलं आहे. यंदा देशातील आंतरराष्ट्रीय मालिका आणि आयपीएल तसंच डब्ल्यूपीएल यांच्यासाठी वेगळा लिलाव झाला. तसंच टीव्ही आणि डिजिटल साठीही वेगळा लिलाव झाला. वायकॉमने आंतरराष्ट्रीय मालिकांचे डिजिटल हक्क ३१०१ कोटी रुपयांना विकत घेतले. तर टीव्ही प्रसारणाचे हक्क २,८६२ कोटी रुपयांना घेतले.
आयपीएलसाठी वायकॉम १८ कंपनीने तब्बल २६,००० कोटींच्या वर पैसे मोजले आहेत. यंदाही टीव्ही प्रसारणापेक्षा डिजिटल प्रसारणाचे पैसे जास्त आहेत. या पाच वर्षांत भारतीय संघ २५ टेस्ट, २७ एकदिवसीय सामने तसंच ३६ टी-२० सामने मिळून एकूण ८८ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. याचाच अर्थ असा की, एका आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी वायकॉम १८ कंपनीने ६७.७६ कोटी रुपये मोजले आहेत. याधीच्या प्रसारण करारात एका सामन्यासाठी बीसीसीआयला प्रत्येकी ६० कोटी रुपये मिळाले होते. म्हणजेच नवीन करारात बीसीसीआयचा प्रत्येक सामन्यामागे ७ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.
(हेही वाचा – Special Session Of Parliament : केंद्र सरकारने बोलावले संसदेचे विशेष अधिवेशन)
पण, त्याचवेळी आधीच्या प्रसारण करारापेक्षा बीसीसीआयला एकूण १७३ कोटी रुपये कमी मिळाले आहेत. कारण, यंदा भारतीय संघ १४ सामने कमी खेळतोय. तसंच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सारखे तगडे संघ भारतात कमी सामने खेळणार आहेत. आयपीएल किंवा मोठी स्पर्धा असेल तरंच प्रसारकांना जाहिरातीतून महसूल मिळतो. किंवा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा संघाविरोधातील मालिकेतून पैसा मिळतो. यंदा भारत ऑस्ट्रेलिया विरोधात २१ तर इंग्लंडच्या संघाविरोधात १८ सामने खेळणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community