Cancer Treatment : कॅन्सरवर अवघ्या सात मिनिटांत उपचार शक्य; ‘या’ ठिकाणी होणार उपचार

रुग्णांच्या कॅन्सरग्रस्त पेशी शोधणे आणि नष्ट करण्यास मदत करणारे इम्युनोथेरपी औषध

181
Cancer Treatment : कॅन्सरवर अवघ्या सात मिनिटांत उपचार शक्य; ‘या’ ठिकाणी होणार उपचार
Cancer Treatment : कॅन्सरवर अवघ्या सात मिनिटांत उपचार शक्य; ‘या’ ठिकाणी होणार उपचार

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी (Cancer Treatment) चांगली बातमी समोर आली आहे. ब्रिटनच्या राज्य-संचालित राष्ट्रीय आरोग्य सेवा संस्थेच्या संशोधनातून सकारात्मक बाब समोर आली आहे. या संस्थेच्या नव्या संशोधनामुळे कॅन्सरवरील उपचारांचा कालावधी तीन चतुर्थांश कमी होणार आहे. मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी (MHRA) च्या मंजुरीनंतर, राष्ट्रीय आरोग्य सेवा संस्थेच्या संशोधनातून इंग्लंडने मंगळवारी सांगितले की, इम्युनोथेरपी, एटेझोलिझुमॅबने उपचार केलेल्या शेकडो रुग्णांना ‘त्वचेच्या खाली’ इंजेक्शन देण्यात आले आहे. आतापर्यंत ज्या शेकडो कॅन्सर रुग्णांवर उपचार इम्युनोथेरपीने होत होते. त्यांना आता त्वचेच्या खाली एटेजोलिजुमॅबचे इंजेक्शन देण्याची तयारी केली आहे. हे एक इम्युनोथेरपी औषध असून रुग्णांच्या कॅन्सरग्रस्त पेशी शोधणे आणि नष्ट करण्यास मदत करते. याचा वापर सध्या फुप्फुस, स्तन, यकृत आणि मुत्राशयाच्या कॅन्सरमध्ये होतो. यामुळे कॅन्सरच्या उपचारांचा वेळ कमी होणार आहे. (Cancer Treatment)

(हेही वाचा – BCCI Digital Media Rights : मुकेश अंबानींच्या वायकॉम १८ ला आयपीएल आणि देशांतर्गत मालिकांचे प्रसारणाचे हक्क)

यापूर्वी कॅन्सर रुग्णांवर सरळ ड्रीपच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांच्या नसांमध्ये इंजेक्शन दिले जात होते. या प्रक्रियेला सुमारे ३० मिनिटे ते एक तासांचा वेळ लागत होता. काही रुग्णांना त्यापेक्षा अधिक वेळ लागतो. नसांमध्ये हे औषध पोहचणे अवघड असते. आता नव्या तंत्रज्ञानात औषध त्वचेत दिले जाईल. यामुळे कॅन्सरवरील उपचारांचा कालावधी अवघ्या ७ मिनिटांवर येऊ शकतो. वेस्ट सफोल्क एनएचएस फाऊंडेशन ट्रस्टचे सल्लागार ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अलेक्झांडर मार्टीन यांनी सांगितले की, या नव्या तंत्राने केवळ रुग्णांवर जलद उपचार मिळतील. या उपचारांमुळे वेळ वाचल्यामुळे अधिक रुग्णांची तपासणी करणे शक्य होणार आहे. (Cancer Treatment)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.