यंदा महाराष्ट्र आणि केरळमध्ये पावसाने पाठ फिरवली आहे. (Lowest Rainfall In Maharashtra) ऑगस्ट महिन्यात फक्त 160 मिमीच्या जवळपास पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट 2023 हे मान्सून वर्ष 1901 नंतरचा सर्वात कोरडा ऑगस्ट महिना म्हणून नोंदवला गेला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात भारतात शतकातील सर्वात कमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 3 महिन्यात पावसाची मोठी तूट दिसून आल्याने देशासह राज्यावर दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे.
(हेही वाचा – Ranjit Savarkar : अमरावतीत सावरकरी विचारांचा जागर; रणजित सावरकरांच्या उपस्थितीत भव्य रॅली)
हवामान विभागाने देशात आत्तापर्यत झालेल्या पावसाची माहिती दिली आहे. ऑगस्टमध्ये पावसाने पुन्हा दडी मारल्याने देशातील पावसाची तूट 9 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. काही भागात चांगला पाऊस झाला आहे, तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 22 टक्के पावसाची तूट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात देखील 1 जूनपासून सरासरीच्या 19 टक्के पावसाची तूट आहे. देशात सरासरीच्या 9 टक्के पाऊस कमी झाला आहे. आत्तापर्यंत देशात 91 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये केरळमध्ये यावर्षी पावसाची मोठी तूट पाहायला मिळात आहे. जूनपासून केरळात आत्तापर्यंत सरासरीच्या 48 टक्के पावस कमी झाला आहे. (Lowest Rainfall In Maharashtra)
ऑगस्ट महिन्याचा विचार केला, तर राज्यात सरासरीच्या उणे 58 टक्के तूट निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या फक्त 42 टक्के पाऊस झाला आहे. सर्वात विदारक परिस्थिती मराठवाड्यात आहेत. कारण तिथे सरासरीच्या केवळ 28 टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ 36 टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली तूट मोठी आहे. या परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. (Lowest Rainfall In Maharashtra)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community