बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत रौप्यपदक पटकावणारा भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी घेत घेतली. पंतप्रधानांनी प्रज्ञानंद याला अधिकृत निवासस्थान 7 लोक कल्याण मार्ग येथे सहकुटुंब निमंत्रित करून त्याचा सत्कार केला आहे. या वेळी मोदींनी त्याच्याकडून बुद्धिबळाचे डावपेच समजून घेतले. त्याच्याशी गप्पा मारल्या. त्याच्या प्रशिक्षकांचा आणि आईचाही सत्कार केला.पंतप्रधानांना भेटून प्रज्ञानंद आणि त्याचे कुटुंबिय यांनीही आनंद व्यक्त केला.
Had very special visitors at 7, LKM today.
Delighted to meet you, @rpragchess along with your family.
You personify passion and perseverance. Your example shows how India’s youth can conquer any domain. Proud of you! https://t.co/r40ahCwgph
— Narendra Modi (@narendramodi) August 31, 2023
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी कुटुंबासह त्यांना भेटणे हा मोठा सन्मान होता. मला आणि माझ्या पालकांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्व शब्दांसाठी धन्यवाद’, अशा शब्दात प्रज्ञानंदने सोशल मीडियावर आभार मानले आहेत.
(हेही वाचा – Gautam Adani in Trouble : अदानी समुहावर पुन्हा हिंडेनबर्गसारखे आरोप, शेअरमध्ये मोठी घसरण)
“तुम्ही उत्कटतेचे आणि चिकाटीचे प्रतीक आहात. भारतातील तरुण कोणत्याही क्षेत्रात कसे विजय मिळवू शकतात, हे तुमच्या उदाहरणावरून दिसून येते. तुझा अभिमान वाटतो!”, असं ट्विट पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनीही त्याच्या यशासाठी केले होते. बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळणारा आर प्रज्ञानंद हा सर्वात तरुण खेळाडू आहे. फायनल जिंकता आली नसली, तरी त्याने भारतीयांची मने नक्कीच जिंकली आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community