देशात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. आगामी लोकसभा निवडणुका आणि एकंदर परिस्थिती पाहता केंद्र शासनानं ऑगस्ट महिन्याअखेरीस घरगुती गॅस दरांमध्ये (LPG Price Reduction) २०० रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला. तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीमध्ये तब्बल १५७ रुपयांनी घट करण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिकृत वृत्तानुसार १ सप्टेंबरपासून इंधन कंपन्यांकडून (LPG Price Reduction) व्यावसायिक वापरातील एलपीजी सिलिंडर दरांमध्ये घट झाली आहे. इथून पुढं हे सिलिंडर १५२२.५० रुपयांना विकले जाणार आहेत. यापूर्वी ऑगस्ट महिन्यातही गॅस दर १०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर, जुलै महिन्यात मात्र सिलिंडरचे दर वाढले होते.
(हेही वाचा – Pragyan Rover : ‘प्रज्ञान बागडतोय, त्याची आई प्रेमाने पाहत आहे’; इस्रोने शेअर केला प्रज्ञान रोव्हरचा नवीन व्हिडिओ)
इंधन कंपन्यांच्या निर्णयानंतर आता १९ किलो वजनाचा व्यावसायिक वापरातील एलपीजी (LPG Price Reduction) आता १६८० ऐवजी १५२२.५० रुपयांना विकला जाणार आहे. म्हणजेच या दरांमध्ये १५७ रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. दिल्लीतही हेच दर लागू असतील. तर, मुंबईत १६४०.५० रुपयांना मिळणारा सिलिंडर आता १४८२ रुपयांना विकला जाणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच विरोधक महागाईच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका करत आहेत. त्यातच केंद्र सरकारने घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (LPG Price Reduction) किंमती स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई कमी (LPG Price Reduction) करण्यासंदर्भात विधान केलं होतं. त्यानुसार आता सिलिंडरच्या किंमतींमध्ये मोठी घट झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community