मुंबई ते मांडवा म्हणजे अलिबाग जलमार्गावर आजपासून फेरीबोट सेवा सुरू होत आहे. मेरी टाईम बोर्डाकडून अलिबाग जलमार्गावर प्रवासी वाहतुकीकरिता ही मान्यता मिळाली आहे.
पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. यादरम्यान दोन महिने ही जलवाहतूक बंद करण्यात आली होती. आता पावसाळ्यात जोर कमी झाल्यानंतर या मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचायला मदत होणार होणार.
(हेही वाचा – Share Market : आठवडा अखेर शेअर बाजार सुस्तावला, वाचा कोणते शेअर्स घसरले )
मुंबई-मांडवा फेरी बोट सुरू झाल्यामुळे अलिबाग, मुरुडकडे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढणार असल्याने या मार्गावरील तिकिटदरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र प्रवासी तिकीट दरात वाढ न झाल्याने प्रवासी आणि पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community