China’s New Map : चीनच्या नवीन नकाशामुळे भारतासह अन्य देशही संतप्त; म्हणाले …

380
China's New Map : चीनच्या नवीन नकाशामुळे भारतासह अन्य देशही संतप्त; म्हणाले ...

चीनकडून काही दिवसांपूर्वी एक नवीन नकाशा प्रकाशित (China’s New Map) करण्यात आला आहे. या नवीन नकाशामुळे जागतिक राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चीनच्या नवीन नकाशावर भारतासह फिलिपाइन्स, व्हिएतनाम, मलेशिया आणि तैवाननेही नाराजी व्यक्त केली आहे. चीनने अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन, तैवान आणि वादग्रस्त दक्षिण चीन समुद्र त्यांच्या हद्दीत असल्याचा दावा केला आहे. अशा आशयाचा त्यांनी एक नवीन नकाशा प्रकाशित केला आहे. सोमवार २८ ऑगस्ट रोजी चीनने आपला नवीन अधिकृत नकाशा प्रसिद्ध केला आहे.

फिलिपाइन्सने चीनला (China’s New Map) जबाबदार निर्णय घेताना आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करावे असा सल्ला दिला आहे तर मलेशियाने नकाशाबाबत राजनैतिक विरोध नोंदवला आहे.

तर दुसरीकडे तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी व्यक्त करत म्हटले की; “आम्ही चीनचा (China’s New Map) भाग नाही. त्यांचे सरकार कितीही आपली बाजू मांडत असले, तरी ते आपल्या देशाच्या अस्तित्वाचे सत्य नाकारू शकत नाही. त्याचवेळी व्हिएतनामने म्हटले की, चीनच्या या नकाशाला काहीही महत्त्व नाही आणि ते व्हिएतनामच्या सीमा आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करते.”

(हेही वाचा – Pro Govinda Competition : गोविंदा खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

या सर्व पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने (China’s New Map) सांगितले की; “आम्ही आमच्या क्षेत्राबद्दल नेहमीच स्पष्ट आहोत. दक्षिण चीन समुद्राबाबतही आमची भूमिका स्पष्ट आहे. यासाठी चीन दरवर्षी अनेक प्रमाणित नकाशे जारी आणि अपडेट करत असतो.”

एप्रिल २०२३ मध्ये चीनने आपल्या नकाशात (China’s New Map) अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांची नावे बदलली होती. चीनने गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे. यापूर्वी २०२१ मध्ये चीनने १५ आणि २०१७ मध्ये ६ ठिकाणांची नावे बदलली होती.

चीनच्या या कृत्याला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चोख प्रत्युत्तर दिले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते – चीनच्या (China’s New Map) अशा कारवाया याआधीही आमच्याकडे आल्या आहेत. आम्ही ही नवीन नावे नाकारतो. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. अशा प्रकारे नाव बदलून वास्तव बदलणार नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.