Nehru Museum : नेहरू म्युझियमच्या नामांतराला राष्ट्रपतींची मंजुरी

सरकारनी जारी केले गॅझेट नोटिफिकेशन

143
Nehru Museum : नेहरू म्युझियमच्या नामांतराला राष्ट्रपतींची मंजुरी

केंद्र सरकारने (Nehru Museum) नेहरू मेमोरियल म्युझियम ऍन्ड लायब्ररीच्या नामांतराचा प्रस्ताव राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवला होता. त्या प्रस्तावाला आता राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. आता हे म्युझियम प्रायमीनिस्टर म्युझियम म्हणून ओळखले जाणार आहे. याबाबत केंद्र सरकारच्या गॅझेटमध्ये सूचना जारी करण्यात आली आहे.

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील ‘एनएमएमएल’च्या विशेष बैठकीमध्ये नाव बदलाचा (Nehru Museum) हा निर्णय घेण्यात आला होता. राजनाथसिंह यांनी या संस्थेच्या नामांतर प्रस्तावाचे मनापासून स्वागत केले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून निवेदन सादर करण्यात आले होते. नव्या मेमोरियलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदींपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांचे देशाच्या विकासातील योगदान ठळकपणे मांडले जाणार असल्याचे यात सांगण्यात आले होते.

(हेही वाचा – China’s New Map : चीनच्या नवीन नकाशामुळे भारतासह अन्य देशही संतप्त; म्हणाले …)

मोदी सरकारच्या निर्णयावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी जोरदार टीका केली होती.’सरकारने सूडवृत्ती आणि क्षुद्रपणा दाखवला’, असा आरोप त्यांनी केला होता. ‘नवे नाव (Nehru Museum) हे राजकारणाच्या पलिकडे जाण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसला ते कळू शकणार नाही. त्यांचा दृष्टिकोन केवळ एका घराण्याचा वारसा जिवंत ठेवण्यापुरता सिमित आहे. देशाच्या इतर पंतप्रधानांच्या योगदानाशी त्यांना काहीही देणेघेणे नाही’ अशी स्पष्टोक्ती सत्ताधारी भाजपने दिली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.