Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना बंदी, राज्य परिवहन मंडळाकडून 250 जादा बसेसची व्यवस्था

श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी नगरपालिका प्रशासनाकडून खास नियोजन

119
Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना बंदी, राज्य परिवहन मंडळाकडून 250 जादा बसेसची व्यवस्था
Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना बंदी, राज्य परिवहन मंडळाकडून 250 जादा बसेसची व्यवस्था

श्रावणातील तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे अनेक भाविक ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी येतात. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे वाढत्या गर्दीला आळा घालण्यासाठी राज्य परिवहन मंडळाकडून 250 जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली असून खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

भाविकांसह निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठीही पर्यटक गोदाकाठच्या बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर येथे येतात. श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी येथे मोठ्या प्रमाणात् गर्दी असते. त्यामुळे पोलिसांकडून जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर धुडगूस घालणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

(हेही वाचा – War Room : सरकारी रुग्णालयांतील गर्दीवर नियंत्रणासाठी आता ‘वॉर रूम’)

नगरपालिका प्रशासनाकडून या काळात भाविकांची होणारी गर्दी पाहता फिरते शौचालय, पाणी, आरोग्य पथक आदींची व्यवस्था करण्यात येत असून खासगी वाहनांना त्र्यंबक शहर परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वरजवळील विविध भागांतून त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची ने-आण करण्यासाठी २५० जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. तीन आणि चार सप्टेंबर रोजी या जादा बस आपली सेवा देणार आहेत. यामध्ये नाशिक ते त्र्यंबक १८०, अंबोली ते त्र्यंबक १०,पहिने ते त्र्यंबक १०, घोटी ते त्र्यंबक १० आणि खंबाळे ते त्र्यंबक ४० अशा २५० बसचे नियोजन करण्यात आले आहे.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.