विरोधी पक्षांच्या इंडिया’आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीसाठी २८ विरोधी पक्षाचे प्रमुख नेते मुंबईत हजर झाले आहेत. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. ही बैठक मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडली. यावरून भाजपने हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. घमंडीया आघाडी, पंतप्रधान मोदीजी विरोधात लढायला निघाले आहेत. पण त्यांचा सेनापती अजून ठरत नाही आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh)यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर केला आहे.
पोटात एक अन ओठात एक कसले पुरोगामी’ नि कसले डावे खुर्चीसाठी ज्यांचा प्राण तळमळे अशा घोटाळेबाजांना काय म्हणावे अस म्हणत निशाणा साधला आहे. इथे कोणाच्याच विचारांचा कोणाशी बसत नाही मेळ पण हातात हात घेऊन सुरु केलाय सत्तेसाठी खेळ असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. भाजपच्या नेत्या चित्र वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर देखील घणाघात केला आहे. घमंडीया आघाडी, पंतप्रधान मोदीजी विरोधात लढायला निघाले आहेत. पण त्यांचा सेनापती अजून ठरत नाही आहे. असे देखील वाघ यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हणले आहे.
(हेही वाचा :Parliament : महिला विधेयक की वन नेशन वन इलेक्शन संसदेचे विशेष अधिवेशन : चर्चेचे गुऱ्हाळ)
राहुल गांधी यांच नाव घेतलं कि ममता बॅनरजी नाव घेतलं कि नितीश कुमार नाराज होतात नितीश कुमारांचं नाव घेतलं कि उद्धव ठाकरे नाराज होतात. आणि उद्धव ठाकरेंचं नाव घेतले कि सगळेच नाराज होतात. या ठगबंधनात उद्धव ठाकरे संपलेल्या पक्षाचे नेते आहेत.त्यांचा विश्वास आहे की मोदींना विरोध केला तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल यातून कळतंय की घमंडीया आघाडी आतून किती पोकळ आहे.
. #घमंडिया आघाडीचा
खेळ भरलाय न्यारा
संधिसाधूंचा मुंबापुरीत
जमलाय गोतावळा साराइथं कोणाच्याच विचारांचा
कोणाशी बसत नाही मेळ
पण, हातात हात घेऊन
सुरू केलाय सत्तेसाठी खेळपोटात एक अन् ओठात एक,
कसले पुरोगामी नि कसले डावे
खुर्चीसाठी ज्यांचा प्राण तळमळे
अशा घोटाळेबाजांना काय…— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 1, 2023
हेही पहा –
Join Our WhatsApp Community