कोकणात गेल्या तीन महिन्यांपासून मच्छिमारी बंदी लागू असल्याने पर्सनेट मच्छिमारीला 1 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. त्यामुळे मोठ्या नौका समुद्रावर स्वार झाल्या आहेत. मागील महिन्याभरात समुद्राला आलेले उधाण, त्यात समुद्रामध्ये येणाऱ्या अजस्त्र लाटा आणि त्याच्या जोडीला वारा अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत नव्या हंगामाला मच्छिमारांना सामोरे जावे लागणार आहे.
रत्नागिरीतील मिरकरवडा बंदर जेटीवर दरदिवशी मच्छी व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते तसेच पर्ससीन नेट, फिशिंग ट्रॉलर, यांत्रिक होड्या, बिगरयांत्रिक होड्या अशा सर्वच नौका मासेमारी करतात. मच्छी व्यवसायातून वर्षाला 100 कोटी रुपयांहून अधिक रुपयांची याठिकाणी उलाढाल होते.यावर्षीच्या नव्या हंगामासाठी मच्छीमार बांधव सज्ज झाले आहेत. होड्यांवरील खलाशीही बंदरामध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्यामुळे बंदर परिसरातील बाजारपेठ पुन्हा एकदा गजबजू लागली आहे. मासेमारासाठी सद्यःस्थितीमध्ये प्रतिकूल वातावरण आहे.
(हेही वाचा – Nashik Municipal Corporation : अनधिकृतपणे झाडे तोडाल तर थेट जावे लागेल कोर्टात)
मच्छिमाराला समुद्रातील प्रतिकूल ठरणारे संभाव्य हवामान अन् वातावरण, त्याच्या जोडीला समुद्राच्या पाण्यामध्ये असणारा वीजप्रवाह या साऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा अंदाज घेऊन पर्ससीन नेटद्वारे मच्छीमार बांधव मासेमारी करणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community