Load Shedding : अपुऱ्या पावसाचा पुन्हा फटका; महाराष्ट्रासमोर लोडशेडिंगचे संकट

126
Load Shedding : अपुऱ्या पावसाचा पुन्हा फटका; महाराष्ट्रासमोर लोडशेडिंगचे संकट
Load Shedding : अपुऱ्या पावसाचा पुन्हा फटका; महाराष्ट्रासमोर लोडशेडिंगचे संकट
अपुरा पाऊस आणि वीजेची वाढलेला मागणी यामुळे महाराष्ट्राला आता लोडशेडिंगचा (Load Shedding) फटका बसणार आहे. राज्यात विजेची मागणी वाढल्याने आणि विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात इमर्जन्सी लोडशेडिंग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना आता रोज अर्धा तास ते दोन तासांच्या लोडशेडिंगला सामोरे जावे लागणार आहे.
राज्यात गेल्या एका महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही पिकांना विहिरीतील पाण्यावर जगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत होत नाही. एकीकडे कमी पडलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे,तर दुसरीकडे महावितरणकडून त्यांना वीजपुरवठा नीट होत नसल्याने काळजी वाढली आहे. विद्युतनिर्मिति कमी होत असल्याने यंदा विजेचा पुरेसा पुरवठा होत नाही.
राज्यात यंदा पावसाने दडी मारल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शेतीसाठी शेतकऱ्यांचा पाण्याचा उपसा वाढला आहे. याचा परिणाम हा विजेचा तुटवडा निर्माण होण्यावर होत आहे. त्यामुळे आपत्कालीन लोडशेडिंग करण्यात येत आहे. विजेची मागणी जशी वाढेल, त्यानुसार हे  लोडशेडिंग करण्यात येत आहे. कधी अर्धा तास, कधी १ तास, तर कधी दीड तासांपर्यंत लोडशेडिंग करण्यात येत आहे. वाढीव मागणी कमी झाली किंवा पाऊस पडला, तर लोडशेडिंग (Load Shedding) आपोआप बंद होईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हेही पहा – 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.