Ajit Pawar : मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा आरोप करणारे जनतेशी दिशाभूल करतात – अजित पवारांचा हल्लाबोल

भारतातीलच नव्हे तर जगातील भारतीयांनी मोदींचे नेतृत्व मान्य केले हे सिद्ध झाले आहे. सर्वसामान्य घटकांपर्यंत योजना पोहचल्या पाहिजेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करते आहे, असेही अजित पवार म्हणाले.

144

अलीकडेच निती आयोगासोबत बैठक झाली, काहीजण विकासाच्या बाबतीत बोलत नाही. राज्याचे हित कशात ते सांगत नाही. परंतु जातीजातीत धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम करायचे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर न्यायची आहे असं पंतप्रधान सांगतात. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून संबोधले जाते. निती आयोगाने देशात ४ शहरे निवडली आहे. टप्प्याटप्प्याने त्या शहरात वाढ होईल. मुंबई वेगळी करण्याचा डाव आहे असा आरोप केला जातो. मी जे बोलतो ते खरे बोलतो, जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत महाराष्ट्रातून मुंबई वेगळी करणे कुणाच्या बापाला शक्य नाही. काहीही सांगायचे आणि दिशाभूल करायची. अनेकदा याप्रकारचे आरोप केले गेले. निव्वळ जनतेची दिशाभूल केली जाते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

तुम्ही विकासावर बोला, राज्याच्या जनतेचे हित कशात आहे त्यावर बोला. काही चुकत असेल तर ते दाखवा. काम करताना एखादी गोष्ट चुकली तर ताबोडतोब दुरुस्त करण्याची तयारी आहे. वाराणसी उत्तर प्रदेशातून, सुरत गुजरातमधून बाहेर काढायचे चालले आहे का? उद्या पुणे, पिंपरी चिंचवडचे नाव घेतले तर तेदेखील राज्यातून काढायचे असा आरोप करणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच मी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करतो, त्याच्या वाटचालीचा आज सर्वात दिशादर्शक टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यशस्वी नेतृत्वात भारताची विकासाकडे घौडदौड सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला. झाले गेले गंगेला मिळाले, नवी पहाट नवीन सुरुवात या दृष्टीने आम्हाला पुढे जायचे आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील भारतीयांनी मोदींचे नेतृत्व मान्य केले हे सिद्ध झाले आहे. सर्वसामान्य घटकांपर्यंत योजना पोहचल्या पाहिजेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करते आहे, असेही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

(हेही वाचा Mumbai – Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर नवे संकट; चौपदरीच्या नवीन रस्त्याला तडे)

महाराष्ट्रातील थांबलेली कामे अधिक वेगाने व्हावीत. राज्यभरात सर्व्हे करून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना कुठेही काही कमी पडू देणार नाही. नैसर्गिक संकटे येतात, अतिवृष्टी होते, दुष्काळ पडतो, दरड कोसळते यासारख्या अनेक प्रसंगांना आम्ही सामोरे गेलो आहे, संकटे आली म्हणून डगमगायचे नसते. अधिक मजबुतीने पुढे जायचे असते. देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींचे हात बळकट करून महाराष्ट्राची शक्ती त्यांच्यामागे उभी करायची आहे त्यासाठी मिशन ४८ संकल्प केला आहे असे अजित पवारांनी सांगितले. मागच्या गोष्टी उकरण्यापेक्षा आपल्या सर्वांची शक्ती आणि सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा यातून चांदा ते बांदा सर्व ४८ जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. अशा सभा झाल्या पाहिजेत. राज्य पातळीवर काम करणारे लोक एकत्र येतात, चर्चा करतात, पण जाणीवपूर्वक आमच्यात वाद असल्याच्या बातम्या पसरवल्या जातात. परंतु महायुतीचे यश, राज्याचे हित कशात आहे, कार्यकर्त्यांना न्याय कसा देता येईल यासाठी एकमेकांशी संवाद ठेवत असतो. महायुतीत समज-गैरसमज राहता कामा नये. मुंबईत हा मेळावा घेतलाय तसा प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक भागात जाऊन जनतेला संबोधित करायचे आहे, असे पवार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.