विरोधकांची इंडिया आघाडी या दोन दिवसीय बैठकांमुळे मुंबईतलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहावयास मिळाले. एकीकडे इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सर्व नेत्यांनी भाजपावर व मोदींवर टीका केली असताना दुसरीकडे महायुकीच्या बैठकीतूनही प्रमुख नेत्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर तोंडसुख घेतलं आहे. लोकांना पत्रकारांनी विचारलं की तुमचंही नाव पंतप्रधान म्हणून घेत आहेत. तर म्हणे ‘हां मी जाऊन लगेच शपथ घेतो’. पण शपथ कुठून घेणार? घरातून की ऑनलाईन? की वर्क फ्रॉम होम? ओथ फ्रॉम होम? फेसबुकवरून? ठीक आहे. जाऊ द्या. असे काही लोक आहेत”, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता लगावला.
इंडिया आघाडीवर टीका करताना एकनाथ शिंदेंनी यूपीए नावाचा संदर्भ दिला. “मोदींची बदनामी करण्याचं काम परदेशात जाऊन काही लोक करतात. खरंतर तोच देशद्रोह आहे. त्यामुळेच ही इंडी आघाडी.. इंडिया नाही.. इंडी आघाडी आहे. यूपीएचं नाव कायम ठेवायला त्यांना लाज वाटली. कारण यूपीएनं एवढा सपाटून मार खाल्ला, त्यामुळे नवीन इंडिया आघाडी तयार केली. जे लोक एक लोगो बनवू शकत नाहीत, ते कसे एकत्र जोडले जाणार? पंतप्रधानपदावर एकमत होणं तर लांबची गोष्ट आहे. मग ते लोकांबरोबर कसे जोडले जातील?” असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.यांची आघाडी म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या अशी झाली आहे. तिथे काही लोकांचं पंतप्रधानपदासाठी लॉबिंग चालू आहे. हे इतक्या स्वार्थाने पछाडलेले लोक आहेत.
(हेही वाचा : Aditya L1 : ‘आदित्य एल-1’ प्रक्षेपणासाठी तयार; ‘या’ ठिकाणी लाईव्ह पाहता येणार)
विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर पंतप्रधानपदासाठी एक उमेदवार उभा करू शकत नाहीत हेच त्यांचे सर्वात मोठे अपयश आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, हे लोक त्यांचा . स्वतःच्या कार्यकर्त्यांना सांभाळू शकले नाहीत. ८० टक्के पक्ष दुसरीकडे गेला. त्यानंतर खरी शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता मिळाली. पक्षाचे चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण आम्हाला मिळाला. आम्ही आता बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका घेऊन पुढे चाललो आहोत. हे लोक स्वतःचं कुटूंब संभाळू शकले नाहीत, ही आघाडी कशी काय सांभाळणार?
हेही पहा –
Join Our WhatsApp Community