मुंबई महापालिका ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आल्यानंतर अनेक गृहनिर्माण सोसायटी आणि वस्त्यांमध्ये कचरा पेट्यांच्या मोठी समस्या निर्माण झाली. अनेक वस्त्यांमध्ये आजही कचरा पेट्या उपलब्ध नसल्याने गृहनिर्माण संस्थांकडून मोठ्याप्रमाणात नाराजी व्यक्त केली जात असून अखेर या कचरा पेट्या महापालिकेला प्राप्त होत असल्याने लवकरच प्रत्येक गृहनिर्माण संस्थांच्या यापूर्वीच्या मागणीनुसार या पेट्यांचे वाटप केले जाणार आहेत.
महापालिका अस्तित्वात असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी गृहनिर्माण संस्थांच्या मागणीनुसार कचरा पेट्या उपलब्ध करून देण्याची विनंती महापालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाच्यावतीने निविदा प्रक्रिया राबवून १ लाख २० हजार कचरा पेट्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. १२० लिटर क्षमतेच्या या कचरा पेट्या खरेदीच्या प्रक्रियेला जानेवारी महिन्यांमध्ये मंजुरी मिळाल्यांनतर या पैंकी ५० टक्के कचरा पेट्या वर्षी तर ५० टक्के कचरा पेट्यांचे पुढील वर्षी वाटप करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार, आता कचरा पेट्या महापालिकेला प्राप्त होत असल्याने प्रत्येक विभाग कार्यालयाच्या मागणीनुसार त्यांना या कचरा पेट्यांचे वितरण केले जाईल आणि विभाग कार्यालयाच्या माध्यमातून यापूर्वी मागणी केलेल्या गृहनिर्माण संस्था तसेच वस्त्यांमध्ये कचरा पेट्या उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गृहनिर्माण संस्था, वस्त्यांसह महापालिका शाळा, रुग्णालय व इतर विभागांमध्येही या कचरा पेट्यांची मागणी असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या कचरा पेट्यांची खरेदी नगरसेवकांच्या निधीतून आजवर केली जात असली तरी नगरसेवक नसल्याने महापालिकेने यासाठी निधीची तरतूद करून या पेट्यांची खरेदी नगरसेवक निधीतून खरेदी केली आहे.
(हेही वाचा – BJP Chitra Wagh : घमंडीया आघाडी, पंतप्रधान मोदीजी विरोधात निघाले पण त्यांचा सेनापती अजून ठरत नाही – चित्रा वाघ)
या १ लाख २० हजार कचरा पेट्यांसाठी सुमारे १८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या निविदेसाठी तीन गट बनवण्यात आले होते आणि त्यानुसार प्रत्येकी ४० हजारच्या गटासाठी निविदा मागवण्यात आले. यामध्ये विमप्लास्ट या कंपनीने १५८४.७१ रुपये एवढा दर आकारला होता, तर दुसऱ्या दोन गटांमध्ये निलकमल ने १५९३ रुपये आणि एरीस्ट्रॉप्लास्ट प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीने १५९८ एवढ्या दराची बोली लावली होती. त्यामुळे अखेर १५८४ या कमी दरात सर्व उत्पादक कंपन्यांनी या डब्यांचा पुरवठा करण्याचा तयारी दर्शवली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community