राज्य शासनाच्या ७५ हजार पदभरती धोरणांतर्गत आरोग्य विभागातील सुमारे ११ हजार जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरतीप्रक्रिया सुरळीत, पारदर्शी व विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे सक्त निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी शुक्रवारी दिले. आज मंत्रालयात आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेबाबत एक विशेष आढावा बैठक मंत्री डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीला अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सहसचिव विजय लहाने, टीसीएस कंपनीचे मयुर घुगे आदी उपस्थित होते.
आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, आरोग्य विभागाची ही भरती प्रक्रिया सर्वात मोठी आहे. त्यामुळे अत्यंत सुरक्षितपणे भरती प्रक्रिया राबवावी. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मागील परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा अनुभव आहे. त्यामुळे कुठलाही गैरप्रकार या परीक्षेत व्हायला नको. परीक्षेसाठी १० ते ११ लाख अर्ज येण्याचे लक्षात घेत सर्वरची क्षमता ठेवावी. सर्वर डाऊनमुळे अर्ज न स्वीकारणे, परीक्षा न देता येणे आदी प्रकार होऊ नयेत, यासाठी कंपनीने आत्ताच नियोजन करण्याच्या सूचनाही डॉ. सावंत यांनी दिल्या.
(हेही वाचा – D Gukesh Replaces V Anand : विश्वनाथन आनंदची ३७ वर्षांची सद्दी मोडून डी गुकेश बनलाय भारताचा अग्रमानांकीत बुद्धिबळपटू)
भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी ‘हेल्प डेस्क’ तयार करावा. भरतीचे तारीखनिहाय वेळापत्रक देण्यात यावे, परीक्षा केंद्रांची आत्तापासूनच निश्चित करावी, उमेदवारांना परीक्षा केद्रांवर येताना असलेले नियम प्रवेशपत्रावर नमूद करावे, असे निर्देशही डॉ. सावंत यांनी दिले. बैठकीला विभागाचे व कंपनीचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community