मुंबईतील अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज हटविण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त व प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी शुक्रवारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता तसेच अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज यावरील कारवाई संदर्भात आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त चहल यांनी शुक्रवारी (१ सप्टेंबर २०२३) यांनी तातडीने बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, संबंधित इतर अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
(हेही वाचा – Chandrapur Tadoba Safari Booking : ताडोबा सफारी बुकिंगसाठीचा मार्ग खुला)
या बैठकीत मुंबईतील अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज काढावीत, आदी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या असून या सर्व सूचनांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज हटविण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. नागरिकांना स्वच्छ, सुंदर व सुखद मुंबईचा अनुभव आला पाहिजे, हे प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे, याचे भान ठेवून नियमितपणे ही सर्व कामे करावीत, असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community