Naresh Goyal : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीकडून अटक

कॅनरा बँकेची ५३८ कोटींची फसवणूक केल्याचे प्रकरण

141
Naresh Goyal : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीकडून अटक

ऋजुता लुकतुके

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल (Naresh Goyal) यांना शुक्रवारी (१ सप्टेंबर) सक्तवसुली संचलनालयाने म्हणजेच ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कॅनरा बँकेकडून घेतलेल्या ५३८ अब्ज रुपयांच्या कर्ज प्रकरणात मनी लाँडरिंग केल्याचा आरोप आहे. शुक्रवारी नरेश गोयल यांची सलग सात तास चौकशी सुरू होती. त्यानंतर रात्री नरेश गोयल यांना अटक करण्यात आली.

गोयल (Naresh Goyal) यांना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग (पीएमएलओ) या कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. आज म्हणजेच शनिवार (२ सप्टेंबर) त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. नरेश गोयल यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ३ मे रोजी तक्रार केली होती. कॅनरा बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या घोटाळ्याविषयीचं प्रकरण आहे. सक्तवसुली संचलनालयाने नरेश गोयल यांच्या मुंबई आणि दिल्लीच्या कार्यालयाची झडती घेतली होती.

जेट एअरवेज कंपनी (Naresh Goyal) २००५ पासून कॅनरा बँकेकडून कर्जं घेत होती. त्यानंतर स्टेट बँकेच्या अधिपत्याखाली बँकांचा एक गट जेट एअरवेजला कर्ज देत होता. पण, जेव्हा कंपनीकडून कर्जाची परतफेड थांबली, तेव्हा बँकांच्या गटाने बाहेरचा ऑडिटर नेमला. या ऑडिटरने दिलेल्या अहवालानुसार, जेट एअरवेजचे काही व्यवहार ऑडिटरला संशयास्पद वाटले. फेब्रुवारी २०२१ मध्येच हा अहवाल प्रसिद्ध झाला होता.

(हेही वाचा – IND vs PAK Asia Cup : सामन्यापूर्वी भारत आणि पाक संघातील खेळाडू हास्यविनोदात रमले)

यात काही महत्त्वाची निरीक्षणं केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशीसाठी लक्षात घेतली होती. जेट एअरवेज कंपनीकडून (Naresh Goyal) काही जणांना कमिशन दिलं जात होतं. तर गोयल कुटुंबीयांचे काही खाजगी खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार, वाहतुकीचा खर्च असे वैयक्तिक खर्चं जेट एअरवेजच्या खात्यातून केले जात होते.

इतकंच नाही तर जेट एअरवेज कंपनीने (Naresh Goyal) धेतलेल्या कर्जातून जेट लाईट या आपल्याच उपकंपनीकडे पैसे फिरवण्यात आले. सुरुवातीला कर्जाच्या रुपाने हे पैसे जेट लाईटला देण्यात आले. पण, पुढे नियमांत बदल करून हे कर्जं माफ करण्यात आलं. त्यामुळे जेट लाईटच्या माध्यमातून पैसे गोयल कुटुंबीयांना मिळाले. तर जेट एअरवेज ही मुख्य कंपनी दिवाळखोरीत निघाली. पण, कर्जाचे पैसे गोयल कुटुंबीयांनी आधीच आपल्या खात्यात वळवले होते.

बँकेच्या गटाकडून कर्ज घेतल्यानंतर जेट एअरवेजने (Naresh Goyal) केलेले अनेक आर्थिक व्यवहार हे संशयास्पद आणि पैशाच्या अफरातफरीचे आहेत, असं केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने आपल्या प्राथमिक गुन्हे अहवालात म्हटलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.