Fishes Died : भाविकांनी तलावात टाकलेली साबुदाण्याची खिचडी खाल्ल्याने हजारो माशांचा मृत्यू

भाविक आणि स्थानिक नागरिकांना तलावात अन्नपदार्थ टाकू नयेत, देवस्थानाकडून आवाहन

154
Fishes Died : भाविकांनी तलावात टाकलेली साबुदाण्याची खिचडी खाल्ल्याने हजारो माशांचा मृत्यू
Fishes Died : भाविकांनी तलावात टाकलेली साबुदाण्याची खिचडी खाल्ल्याने हजारो माशांचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या शेजारी असलेल्या गौतम तलावात क भाविकांनी टाकून दिलेली साबुदाणा खिचडी खाल्ल्याने तलावातील हजारो मासे मरण पावले आहेत. मोठ्या प्रमाणात मृत पावलेल्या या माशांमुळे तलाव परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

त्र्यंबकेश्वर येथील दक्षिण दरवाजाजवळ भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले होते. दर्शन आटोपल्यावर भाविक दक्षिण बाजूस असलेल्या गायत्री मंदिराच्या दरजावाने बाहेर पडतात. यावेळी गौतम तलावात गेल्या 15 वर्षांपासून जोपासना करण्यात आलेल्या माशांना भाविकांनी ही साबुदाणा खिचडी खाऊ घातली. यासाठी त्यांनी खिचडीने भरलेले द्रोण तलावात टाकून दिले. त्यामुळे तलावाच्या पाण्यात साबुदाण्यामुळे चिकट तवंग तयार झाला. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी खालावली आणि मासे मरण पावले. मंगळवार, 29 ऑगस्टपासून दररोज मासे मरून पाण्यावर तरंगत आहेत.

(हेही वाचा – Neeraj Chopra : नीरज चोप्रा पाकिस्तानी प्रतिस्पर्धी अर्शद नदीमबद्दल काय म्हणाला? )

नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तलावातील मृत मासे काढून तलावातील पाणी वाहते ठेवण्यासाठी असलेल्या झडपा खुल्या केल्या आहेत.तरीही दुर्गंधी कमी झालेली नाही. यापूर्वी दोन तलावातील मासे मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रसंगाची गांभीर्याने दखल घेत मुख्याधिकारी श्रीया देवचके यांनी ही पाहणी केली. त्यांनी देवस्थान ट्रस्ट प्रशासनाला पत्र दिले असून, त्यामध्ये तलावाच्या परिसरात साबुदाणा खिचडी वाटप करण्यात येणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. भाविक आणि स्थानिक नागरिकांनी तलावात अन्नपदार्थ टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.