IND vs PAK Asia Cup : भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाचा खोडा, काही वेळेसाठी सामना थांबला

138
IND vs PAK Asia Cup : भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाचा खोडा, काही वेळेसाठी सामना थांबला

आशिया चषक स्पर्धेत आज म्हणजेच शनिवार २ सप्टेंबर रोजी (IND vs PAK Asia Cup) भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना खेळला जात आहे. मात्र आता पावसामुळे हा सामना काही वेळेसाठी थांबवण्यात आला आहे. सध्या पावसामुळे खेळपट्टीवर कव्हर्स टाकण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही संघाचे खेळाडू पेव्हेलिअनमध्ये परतले आहेत. चौथ्या षटकानंतर सामन्यात रिमझिम पावसाची सुरुवात झाली

भारताकडून (IND vs PAK Asia Cup) रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सावध सुरुवात केली आहे. ३.१ षटकानंतर भारताने नाबाद १४ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा ११ धावांवर खेळत आहे.

(हेही वाचा – IND vs PAK Asia Cup : सामन्यापूर्वी भारत आणि पाक संघातील खेळाडू हास्यविनोदात रमले)

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली

भारताचा कर्णधार (IND vs PAK Asia Cup) रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह याचे टीम इंडियात कमबॅक झाले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने नेपाळविरोधातील विजयी संघ मैदानात उतरवला आहे. नाणेफेकीनंतर बोलताना बाबर आझम याने प्रथम फलंदाजी करायची होती, असे सांगितले. रोहित शर्माने मोक्याच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. आता सामना कोण जिंकणार याकडे क्रिकेट प्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.

मोहम्मद शामी (IND vs PAK Asia Cup) याला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळालेले नाही. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्या जोडीला शार्दूल ठाकूर याला संधी देण्यात आली आहे. मध्यक्रममध्ये श्रेयस अय्यर याचे कमबॅक झाले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.