Aditya-L1 : ‘हे वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांचं यश’, आदित्य एल-1च्या प्रक्षेपणानंतर पंतप्रधान मोदींनी केले वैज्ञानिकांचे कौतुक

130
Aditya-L1 : 'हे वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांचं यश', आदित्य एल-1च्या प्रक्षेपणानंतर पंतप्रधान मोदींनी केले वैज्ञानिकांचे कौतुक

इस्रोच्या आदित्य एल १ या (Aditya L1) यानाचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचे आदित्य (Aditya L1) यान सूर्याच्या दिशेने झेपावले आहे. शनिवार २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी सतीश धवन अवकाश केंद्रात लोकांची बरीच गर्दी जमली होती. इस्रोच्या (ISRO) या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणं सहज शक्य होणार आहे.

या प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी इस्रोचे (ISRO) शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, हे वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांचं यश आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर भारताने पुन्हा एकदा आपला अंतराळातील प्रवास सुरु केला आहे.

(हेही वाचा – Aditya-L1 Launching : आदित्य L1 तयार करण्यात पुण्यातील आयुकाच्या शास्त्रज्ञांची महत्त्वाची भूमिका)

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी आमचे अथक प्रयत्न हे सुरुच राहतील. चंद्रयानाच्या नंतर भारताने आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. यासाठी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘या’ पाच टप्प्यांमध्ये पूर्ण होणार प्रवास

हे आदित्य (Aditya L1) यान पाच टप्प्यांमध्ये सूर्याचा प्रवास करणार आहे. पीएसएसव्ही रॉकेटच्या माध्यमातून हे यान पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येणार आहे. त्यानंतर हे यान पृथ्वीच्या कक्षेतच फिरणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हे यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर काढण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात या यानाचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु होईल. चौथ्या टप्प्यात हे यान लॅग्रेंज बिंदूच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. पाचव्या टप्प्यात हे यान सूर्याचा अभ्यास करण्यास सुरुवात करेल. या संपूर्ण प्रक्रियेस जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पण पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे.

या सौरमोहिमेद्वारे (Aditya L1) सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर, अंतराळातील हवामान, सौरवादळे आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.