Portable Hospital : भारताने बनवले जगातील पहिले आपत्कालीन ‘पोर्टेबल हॉस्पिटल’, वाचा वैशिष्ट्ये 

597
Portable Hospital : भारताने बनवले जगातील पहिले आपत्कालीन ‘पोर्टेबल हॉस्पिटल’, वाचा वैशिष्ट्ये 
Portable Hospital : भारताने बनवले जगातील पहिले आपत्कालीन ‘पोर्टेबल हॉस्पिटल’, वाचा वैशिष्ट्ये 

भीष्म प्रकल्पांतर्गत भारतात जगातील पहिले आपत्कालीन हॉस्पिटल (Portable Hospital) उभे केले गेले आहे. पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे हे हॉस्पिटल देशातील कोणत्याही ठिकाणी अवघ्या ८ मिनिटांत उभारता येऊ शकते. आहे. आपत्तीग्रस्त भागात अवघ्या ८ मिनिटांत हे तात्पुरते हॉस्पिटल उभे केले जाईल आणि तातडीने तेथे उपचारही सुरू करता येतील, अशी या हॉस्पिटलची रचना आहे.हे आपत्कालीन हॉस्पिटल उभे करण्यासाठी ७२० किलो वजनाच्या ३६ लोखंडी बॉक्समधून आवश्यक साहित्य सुसज्ज ठेवले जाते. वेळप्रसंगी हेलिकॉप्टरमधून हे बॉक्स खाली फेकले, तरी ते सुरक्षित राहतात, अशी या लोखंडी बॉक्सची रचना असते. शिवाय, पाण्यापासूनही ते सुरक्षित आहेत. १०० जणांवर ४८ तासांपर्यंत तातडीचे उपचार करता येतील, इतकी क्षमता आहे. या हॉस्पिटलला आरोग्यमैत्री असे नाव देण्यात आले असून बॉक्सला आरोग्य मैत्री क्यूब असे नाव देण्यात आले आहे.

(हेही वाचा – FIRECRACKERS BAN : प्रदूषणकारी फटाक्यांवरील निर्बंधांसाठी काय उपाययोजना केल्या ? – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्न)

पंतप्रधान मोदी यांनी गतवर्षी भीष्म प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने भीष्म टास्कची स्थापना केली. या प्रकल्पाचे प्रमुख एअर व्हॉईस मार्शल तन्मय राय यांनी या आपत्कालीन हॉस्पिटलमध्ये रक्त तपासण्यापासून एक्स-रे काढेपर्यंत आणि अगदी व्हेंटिलेटर्सपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध असतील, असे सांगितले. हे हॉस्पिटल सौरऊर्जा आणि बॅटरीवर चालणारे आहे. शिवाय, निर्यात करता येईल, असे हे मॉडेल असणार आहे. अशा प्रकारचे हॉस्पिटल तयार करण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च येतो. भारत हे रुग्णालय तीन देशांना मोफत देणार आहे. सरकार लवकरच त्याची घोषणा करणार आहे. आतापर्यंतच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कोणत्याही आपत्तीमध्ये सुमारे २ टक्के लोकांना त्वरित गंभीर वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते. या आपत्कालीन हॉस्पिटलमुळे आपत्तीग्रस्त भागात वैद्यकीय मदत देणे सोयीचे होणार आहे. (Portable Hospital)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.