आमदार नरेंद्र मेहता यांचा मुलगा तक्षिलच्या महागड्या मोटारीला वरळी सी लिंक वर शनिवारी (०२ सप्टेंबर) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात तक्षिल हा किरकोळ जखमी झाला असून मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाता प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात तक्षिल विरोधात निष्काजीपणे भरधाव वेगाने वाहन चालवून इतरांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्षिल नरेंद्र मेहता (१९) हा शनिवारी सकाळी वांद्रे येथून वरळी येथे आपल्या ‘लॅम्बोर्गिनी हुराकन कूप माय १५’ या महागड्या मोटारीने भरधाव वेगाने जात असताना त्याचे मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि मोटार थेट सी लिंक च्या कठड्याला धडकली. मोटारीतील एअर बॅग उघडल्याने तक्षिल हा या अपघातात बचावला असला तरी त्याच्या उजव्या हाताला भाजल्याच्या जखम झाली. या अपघातात मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
(हेही वाचा – Trishul War Memorial : लेहमध्ये होणार त्रिशूळ संग्रहालयाचे भूमीपूजन; लष्करी पर्यटनाची सुरुवात)
घटनास्थळी दाखल झालेल्या वरळी पोलिसांनी तात्काळ तक्षशील याला मोटारीतून बाहेर कडून पोद्दार रुग्णालयात उपचारासाठी आणून त्याच्यावर उपचार करून वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी तक्षिल विरोधात निष्काजी पणे भरधाव वेगाने वाहन चालवून इतरांच्या जीवाला धोका निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community