Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढल्याची साक्ष असलेली वाघनखे भारतात परत येणार… ‘या’ दिवशी मुख्यमंत्री लंडनला जाणार !

वाघनखे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात येणार

178
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढल्याची साक्ष असलेली वाघनखे भारतात परत येणार... 'या' दिवशी मुख्यमंत्री लंडनला जाणार !
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढल्याची साक्ष असलेली वाघनखे भारतात परत येणार... 'या' दिवशी मुख्यमंत्री लंडनला जाणार !

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची ब्रिटन येथे असलेली वाघनखे लवकरच महाराष्ट्रात आणण्यात येतील. ब्रिटनने वाघनखे आणण्यासंदर्भात ब्रिटनसोबत करार झाला असून त्यासाठी १ ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह लंडनला जात आहोत,’ अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी दिली. मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सव अभियानासंदर्भात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या प्रसंगी ते बोलत होते. या बैठकीला भाजप प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर किशोर शितोळे, दिलीप थोरात, कचरू घोडके यांच्यासह विभागातील जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – Drugs In Pune : धक्कादायक! महाराष्ट्र शासनाची पाटी लावून गांजाची वाहतूक… पुणे पोलिसांनी केली मोठी कारवाई !)

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ठेवणार

मनुंगटीवार म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी वापरलेली वाघनखे राज्यात लवकरच आणणार आहोत. हा अनमोल ठेवा मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात येईल, शिवप्रेमींना ते पाहता यावेत. यासाठी विशेष वाहन सेवा, बस, रेल्वेचे अर्धे तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. ‘शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रम होत आहेत. जाणता राजा महानाट्याचे विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले असून, कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन त्यांनी केली.

‘मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवाच्या सांगता सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी भरीव अनुदान देण्यात आले असून, हा कार्यक्रम केवळ सरकारी न होता यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन योगदान द्यावे, विविध कार्यक्रमांच्या नियोजनात सक्रिय सहभाग नोंदवावा,’ असे आवाहन त्यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही निमंत्रण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अफझलखानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला वध आणि त्यासाठी वापरलेली `वाघनखे`, हा इतिहासकारांच्या अभ्यासात नेहमीच महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. आता हीच `वाघनखे`, ब्रिटनमधून भारतात आणण्यात येणार आहेत. ही वाघनखे सध्या व्हिक्टोरिया अ‍ॅन्ड अलबर्ट म्युझिअम, लंडन येथील संग्रहालयात आहेत. (Chhatrapati Shivaji Maharaj)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.