प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि गजरा ग्रुपचे प्रमुख हेमंत पारख (Hemant Parakh kidnapped) यांचे अपहरण झाल्याने इंदिरानगरसह नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. इंदिरानगर येथील राहत्या घरासमोरुन त्यांचे अपहरण झाले. मिळालेल्या माहितीनुसार शनिवार २ सप्टेंबर रोजी रात्री ९:४० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चारचाकी आणि दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी त्यांचे अपहरण केले.
(हेही वाचा – Bhiwandi Building Collapses : भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली, दोन जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी)
अपहरण झाल्याचे कळताच रहिवाशांनी पोलिसांना घटनेबाबत कळवले. त्यानंतर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत हेही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तत्काळ तपासाला (Hemant Parakh kidnapped) सुरुवात केली असून परिसरातील सीसीटीव्ही तपासले आहेत. तसेच अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.
या अपहरणामागचे (Hemant Parakh kidnapped) नेमके कारण अजून समजू शकलेले नाही. हे अपहरण का करण्यात आले, तसेच कोणी केले याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे. त्यामुळे आता या अपहरणकर्त्यांना लवकर पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community