Water Recycling : जलशुद्धीकरणातून वाया जाणाऱ्या पाण्याची नवी जोड: मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यात १३ते १६ दशलक्ष लिटर एवढी वाढ

258
Water Recycling : जलशुद्धीकरणातून वाया जाणाऱ्या पाण्याची नवी जोड: मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यात १३ते १६ दशलक्ष लिटर एवढी वाढ

सचिन धानजी, मुंबई

बदलते वातावरण आणि बेभरवशाचा पाऊस यामुळे कधी अधिक तर कधी कमी पाऊस पडून मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी आवश्यक असणारा पाणी साठा (Water Recycling) निर्माण होण्याची महापालिका जल अभियंता विभागाला धास्ती असते. त्यामुळे पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करण्यावर महापालिकेने भर दिला असून समुद्राचे पाणी गोडे करणे, विहार तलाव ओसंडून वाहील्यानंतर त्यातील पाणी भांडुप संकुलात वाहून नेत त्याचा वापर करणे या पर्यायी स्रोतांचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केल्यानंतर वाहून जाणाऱ्या तथा वाया जाणाऱ्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्या पाण्याचा वापर करण्याचा प्रकल्प आता आकाराला आहे. या प्रकल्पातून मागील सहा महिन्यांपासून पुनर्प्रक्रिया (Water Recycling) केलेल्या पाण्यातून १३ ते १६ दशलक्ष लिटर पाणी अतिरिक्त प्राप्त होत आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या महापालिकेकडून आता जलशुद्धीकरणातून वाया जाणाऱ्या पाण्याचाही पुनर्वापर (Water Recycling) केला जात आहे. महापालिकेच्या पिसे- पांजरापोर येथील जलशुद्धीकरणातून दरदिवशी सोडून देण्यात येणारे ४० दशलक्ष (४ कोटी लिटर) लिटर एवढ्या पाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प मागील सहा महिन्यांपूर्वी कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे पांजरापोरच्या गाळणी यंत्रातून शुद्धीकरणातून वाया जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून वाया जाणाऱ्या पाण्यावर पुन्हा शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जात असून त्यातून १३ ते १६ दशलक्ष लिटर शुद्ध पाणी अधिक उपलब्ध होत असल्याची माहिती जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Jalna Maratha Andolan : आंदोलनकर्त्यांनी १९ बसेस पेटवल्या; एसटी महामंडळाचे ४ कोटींचे नुकसान)

मुंबई महापालिका दरदिवशी ३९०० (३९० कोटी लिटर) दशलक्ष लिटर एवढा पाण्याचा पुरवठा (Water Recycling) करते. तानसा,अप्पर वैतरणा, तुळशी, विहार, मध्य वैतरणा, मोडक सागर या तलावांच्या तुलनेत एकट्या भातसा धरणातून ५० टक्क्यांहून अर्थात २११४ (२११ कोटी लिटर) दशलक्ष लिटर एवढा पाणी पुरवठा होतो. या धरणातून घेण्यात येणाऱ्या पाण्यापैकी १३६५ दशलक्ष ( १३७ कोटी लिटर) लिटर एवढ्या पाण्यावर पांजरापोर येथे शुद्धीकरण करण्यात येते आणि उर्वरित पाण्यावर वैतरणा शुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. मात्र, पाजरापोर येथील जलशुद्धीकरणातून प्रक्रिया केल्यानंतर ४० दशलक्ष लिटर खराब पाणी सोडून देण्यात येते. या वाया जाणाऱ्या पाण्यावर पुनरप्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने पांजरापूर येथे ६० दशलक्ष क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याच्या कामाचा निर्णय २०१६ मध्ये तत्कालीन जल अभियंता रमेश बांबळे यांच्या कारकर्दीत घेण्यात आला होता. या प्रकल्प अंतर्गत या सोडून देण्यात येणाऱ्या खराब पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. सध्या हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारला गेला असून मागील सहा महिन्यांपासून या पुनर्वापर (Water Recycling) प्रक्रियेतून अधिकचा पाणी साठा उपलब्ध होत आहे.

मुंबईतील सर्व धरणातील पाणी पुरवठा वितरणाच्या माहिती करता पत्रकारांचा अभ्यास दौरा शनिवारी (२ सप्टेंबर) आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारांशी बोलताना जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी मागील सहा महिन्यांपासून पांजरापोर जल शुध्दीकरण केंद्रातून शुध्दीकरण नंतर वाया जाणाऱ्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया (Water Recycling) केली जात असून त्यातून दिवसाला ३० ते ३५ दशलक्ष लिटर पाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्यात येत आहे.

पूर्वी जल शुध्दीकरणणानंतर उरणारे पाणी गटार, नाल्यात सोडले जात होते. पण आता त्या वाया जाणाऱ्या प्रत्येक थेंबाचा (Water Recycling) उपयोग केला जात आहे. या प्रकल्पाची एकूण क्षमता ६० दशलक्ष एवढी आहे. या पुनर्वापर प्रक्रियेमध्ये ३० ते ३५ दशलक्ष लिटर पाण्याचा वापर पुन्हा करण्यात येतो. यातून १३ ते १६ दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा उपलब्ध होत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जसे जसे क्षमता वाढत जाईल तसे या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून अधिक पाणी उपलब्ध केले जाईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.