Jalna Maratha Andolan : जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर; कारवाईला सुरुवात

143
Jalna Maratha Andolan : जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर; कारवाईला सुरुवात
Jalna Maratha Andolan : जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर; कारवाईला सुरुवात

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावातील मराठा आंदोलनाचा (Jalna Maratha Andolan) मुद्दा चिघळला आहे. या वेळी आंदोलकांनी पोलिसांना मारहाण केल्यानंतर पोलिसांनीही लाठीमार केला. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहे. आता सरकारनेही या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे. गृहमंत्रालयाकडून जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Heath Streak : झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीकने घेतला जगाचा निरोप, क्रिडाविश्वावर शोककळा)

या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी एसटी बसेस फोडण्यात येत असल्याने, तसेच बस जाळपोळीच्या घटना घडत असल्याने राज्य परिवहन महामंडळाकडून खबरदारी म्हणून मराठवाड्यात जाणाऱ्या शेकडो बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवासी आणि एसटीसह एसटीचे कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यवतमाळ जिल्ह्यातून नांदेड, पुणे, संभाजीनगरसह मराठवाड्याकडे जाणाऱ्या 16 गाड्या स्थगित करण्यात आल्या आहेत. ऐनवेळी ही परिस्थिती उद्भवल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातून पुसद मार्गे जाणाऱ्या मराठवाड्यातील गाड्या सध्यास्थिती स्थगित करण्यात आल्या असून, मराठवाड्यातून सुद्धा बसेस यवतमाळ जिल्ह्यात येण्याचे थांबवल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. परंतु आंदोलनाची परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुसद आगाराने दिली आहे. (Jalna Maratha Andolan)

औरंगाबाद, बीड, जालना, लातूरसह अहमदनगरकडे जाणाऱ्या अनेक बस सध्या डेपोतच उभ्या असल्याचे दिसून येत आहे. तर पुण्यातून जाणाऱ्या 600 पेक्षा अधिक बस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Jalna Maratha Andolan)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.